विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वैशालीताई देशमुख यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी माजी आ. वैजनाथ शिंदे

लातूर (एल.पी.उगीले) विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडणुका झाल्यानंतर कार्यकारणीच्या निवडीच्या बैठकीमध्ये अध्यक्षांनी उपाध्यक्षाची निवड ही बिनविरोध करण्यात आली.
. कारखान्याचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने याप्रसंगी बिनविरोध निवड झालेले नूतन पदाधिकारी तसेच संचालकांचे अभिनंदन आमदार अमित विलासराव देशमुख यांनी करून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्यांच्या प्रेरणेतून या कारखान्याची उभारणी झाली आहे, ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या कारखाना परिसरात उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी नूतन पदाधिकारी व संचालक मंडळ यांच्या समवेत जाऊन विनम्र अभिवादन केले.
ग्रामीण भागात आर्थिक परिवर्तन घडवून कष्टकरी, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा उद्देश समोर ठेवून या कारखान्याची उभारणी करण्यात आली असल्याचेही याप्रसंगी आ. अमित देशमुख यांनी सांगितले. उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने प्रमाणिकपणे वाटचाल चालू असल्यामुळेच, सभासद शेतकऱ्यांनी संचालक मंडळांना बिनविरोध निवडून दिले आहे, याची जाणीव ठेवून आगामी काळातही त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करत राहण्याचा संकल्प यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सहसंचालक मंडळांनी केला.