राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

0
राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या वतीने मोठ्या उत्साहात शहरातील सर्व जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. उदगीरच्या परंपरेप्रमाणे विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध प्रभागातून जयंती महोत्सव समितीची स्थापना करून जयंती साजरी करण्यात आली. आंबेडकरी चळवळीला गतिमान करत विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घराघरात पोहोचवण्या साठी तथा संविधानाचे महत्त्व सांगण्या साठी सतत प्रयत्न करत राहणाऱ्या राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे महाराष्ट्र प्रमुख तथा भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांच्या संकल्पनेतून जयंती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने शहरातील विविध प्रभागातल्या जयंती समितीच्या मिरवणुकीतून एकात्मतेचा संदेश देत मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीच्या मार्गामध्येच राष्ट्रीय दलित अधिकार मंचने आपले स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून शहरातील सर्व जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत, सत्कार आणि सन्मान निवृत्तीराव सांगवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. याप्रसंगी युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ काटे, बहुजन विकास अभियानचे प्रमुख संजय कुमार, यांच्यासह अर्जुनराव गोडबोले, अशोक बुकटे, दयानंद भालेराव, संभाजी तिकटे, प्रीतम सूर्यवंशी, राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या महाराष्ट्र महिला प्रमुख सुस्मिता माने (जाधव), सोनाली शिंदे (बनसोडे), विधीज्ञ रुक्मिणीताई सोनकांबळे, ज्योती एकुरकेकर, सूर्यकला तिकटे, दैवशाला मसुरे, प्रकाश मसुरे, मुक्रम जागीरदार, रवी जवळे, बबलू सांगवे, दीक्षा सोनकांबळे, उषा शिंदे, आयाज जागीरदार, विकास मुळखेडे, दत्ता कांबळे, रोहित कांबळे, प्रदीप कांबळे यांनी या सत्कार समारंभाचे नियोजन उत्कृष्ट रित्या केले होते.
भारतीय दलित पॅंथर आणि राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या विचारधारेतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वजीत गायकवाड यांचाही सत्कार आणि सन्मान व्यासपीठावर करण्यात आला. याप्रसंगी शहरातील आंबेडकरी चळवळीतल सक्रिय कार्यकर्ते आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि पुढारी यांच्यासह नोकरदार वर्गातील उच्च पदावरील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!