शिक्षकांचे बंद केलेले जीपीएफ कपात सात दिवसात पूर्वत सुरू करणार – शिक्षण उपसंचालक

लातूर (एल.पी.उगीले) धाराशिव जिल्ह्यातील 1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जीपीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी खाते पूर्ववत सुरु करण्यात यावे, या मागणी साठी धाराशिव जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनाच्या वतीने लातूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालसमोर दिवसभर आक्रमक धरणे आंदोलन केले. जोपर्यंत शिक्षण उपसंचालका कडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत. अशी भूमिका घेत साडे चारशे ते पाचशे शिक्षकांनी प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन केले.
या आंदोलनाच्या शिष्टमंडळाने आक्रमक भूमिका घेत, हट्ट धरल्यानंतर शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी येऊन लेखी आश्वासन दिले की, येत्या सात दिवसात धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची जीपीएफ खाती सुरु करू.नवीन प्रस्ताव देखील मंजूर करू. असे आश्वासन दिल्याने अखेर हे अआंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघांचे अनिल वसंतराव काळे, बालाजी तांबे, बालाजी इतबारे, राजकुमार मेंढेकर, बी.एम. वायसे, एस. बी. चव्हाण, मराठवाडा शिक्षक संघांचे सूर्यकांत विश्वासराव, जयपाल शेरखाने, व्ही. एस. मायाचारी, डी. के. भोसले, शिक्षक संघर्ष संघटनेचे हनुमंत मोरे, संजय कळकुंबे, नितीन आडसकर, नानासाहेब बोराडे, प्रताप कोकाटे, वैभव गिरी, अंशता अनुदान प्राप्त 2005 पूर्व शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेचे भालचंद्र साबळे, धाराशिव जिल्हा मुख्यद्यापक संघाचे सुरेश टेकाळे, राजेंद्र मडके, सुनील पडघन, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे विश्नाथ दहिफळे,यांच्यासह या आंदोलनात शिक्षक संघर्ष संघटना महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य अंशत: 2005 पूर्वी अनुदानित संघटना, मराठवाडा शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भारती संघटना, धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ, मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघ, महाराष्ट्र शिक्षकेत्तर संघटना अशा विविध संघटनेचे शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.