पोलीस ठाणे स्तरावर मिनी सायबर सेल स्थापन.

लातूर (एल.पी.उगीले) नागरिकांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या सायबर गुन्हेगारीस रोखण्याकरीता, योग्य पद्धतीने तपास करणे, सायबरपोर्टल वरील तक्रारींची निर्गती करणे तसेच लातूर जिल्ह्यातील जनतेला सायबर जनजागृती अभियान राबवून सायबर साक्षर करणे या उद्देशाने सोमय मुंडे पोलीस अधीक्षक, लातूर यांचे संकल्पनेतून व आदेशाने डॉ.अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पो. अंमलदार यांचेकरीता सायबर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
या वेळी जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय कार्यालये व पोलीस ठाणे येथील एकूण 42 अधिकारी व अंमलदार यांना NCCR पोर्टलची कार्यपद्धती, तक्रारींची निर्गती, सायबर गुन्ह्यांच्या तपासाची कार्यपद्धती या बाबत या कार्यशाळेत श्रीमती बबिता वाकडकर, पोलीस निरिक्षक, सायबर पोलीस ठाणे लातूर यांनी पी.पी.टी. सह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
तसेच पोलीस अंमलदार नळेगावकर व सुजाता कसपटे यांनी NCCRP या सायबर पोर्टलची कार्यपद्धती याचे प्रात्यक्षिक दिले. या साठी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार देवडे,पतंगे,सुडे,माळी,साठे, गायकवाड, आलापुरे, सोळंके यांनी कार्यशाळा यशस्वी करण्याकरीता सहकार्य केले आहे.
सायबर पोलीस ठाणे, लातूर यांचे वतीने लातूर जिल्ह्यातील सर्व
करून त्यांना प्रशिक्षित करणे करीता सायबर कार्यशाळा घेण्यात आले बाबत.