अविनाश पुप्पलवाड यांना दोन टॅब व उत्कृष्ट व्हिडिओ निर्मिती पुरस्कार

उदगीर,
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण,पुणे व डाएट मुरुड यांच्यामार्फत आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती जिल्हास्तरीय स्पर्धेत इयत्ता 6 वी ते 8 वी गणित विषयाचे उत्तम व्हिडिओ निर्मितीसाठी जि. प. प्रा. शा. कुमठा खुर्द शाळेतील तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पदवीधर शिक्षक अविनाश लिंबाजी पुप्पलवाड यांनी लातूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करून सन्मानचिन्ह, ट्रॉफी, प्रमाणपत्र,टॅब व 10000 रुपयांचे बक्षीस प्राप्त केले. तसेच तालुक्यातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल 2500 रू पारितोषिक प्राप्त झाले.तसेच त्यांनी AFE-CSTE ऑनलाईन ट्रैनिंग कोर्स डाएट मुरुड द्वारे आयोजित कोर्स उत्कृष्टरित्या पूर्ण करून उदगीर तालुक्यातून प्रथम क्रमांक व जिल्ह्यातून टॉप 20 मध्ये क्रमांक मिळवल्यामुळे त्यांना पुन्हा टॅब व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी शेख, केंद्रप्रमुख श्री राठोड, मुख्याध्यापक पंडित हुरूसनाळे, शाळा व्यवस्थापन समिती,सरपंच ग्रामस्थ,कुमठा खुर्द,शाळेतील सहकारी स्टाफ तसेच मित्रपरिवारांनी अभिनंदन केले.