स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ भाऊराव यादव व सचिवपदी डॉ स्वप्ना निलंगेकर यांची निवड

0
स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ भाऊराव यादव व सचिवपदी डॉ स्वप्ना निलंगेकर यांची निवड

लातूर (एल.पी.उगीले) लातूर स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या 2025-26 या वर्षासाठी नूतन कार्यकारणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. भाऊराव यादव यांची तर सचिव पदी डॉ स्वप्ना निलंगेकर यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली. त्याचबरोबर नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण कार्यक्रम दिमाखात पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या सोबत प्रमुख उपस्थितीत शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड प्रसूती व स्त्रीरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. अरुण महाले , इंडियन असोसिएशन ऑफ गायनॅकोलॉजिकल एंडोस्कोपिस्ट अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अभय कदम आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल निरीक्षक डॉ. वर्षा दरडे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.राजेश दरडे, हे मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात लातूर स्त्रीरोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. भाऊराव यादव यांची,तर सचिवपदी डॉ. स्वप्ना निलंगेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात मातृपोषण, गर्भवतींच्या विकासातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची भूमिका, वयोवृध्द स्त्रियांची अवस्था आणि त्यावरील उपचार अशा महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.या वैद्यकीय शैक्षणिक कार्यक्रमास लातूरसह निलंगा, उदगीर, औसा आदी भागांतील सुमारे 150 स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.हा कार्यक्रम ज्ञानाची देवाण-घेवाण, सुसंवाद आणि स्त्रीरोग शास्त्रातील नवनवीन वाटचालीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या कार्यक्रमात प्रामुख्याने डॉ. मनिषा हलकंचे, डॉ. मंदाडे, डॉ. वैशाली चपळगावकर, डॉ. स्वाती नरवाडे,डॉ सुचिता सुर्यवंशी, डॉ. स्वाती गोरे, डॉ. ज्योती सुळ, डॉ. मेघना गुगळे, डॉ. कुणाल जाधव, डॉ. गिरीधर सुर्यवंशी, डॉ. विष्णु तारसे, डॉ. मुशीर शेख, डॉ. चेतन सावरीकर, डॉ. निहारीका नागरगोजे , डॉ. सुरेखा निलंगेकर, डॉ. मनोज परबत, डॉ. वैशाली दाताळ, डॉ. स्नेहल यादव, डॉ. राखी सारडा, डॉ.शारदा इरपतगिरे, डॉ. रचना जाजू, डॉ. अनिता पवार, डॉ. मनिषा बरमदे ,डॉ.वारे, डॉ. इडगर, डॉ. रवींद्र करमुडी, डॉ. काळे, डॉ. आस्मा शेख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!