भानुदासभैय्या कैलवाड मित्रमंडळाच्या वतीने निलेश कुंभारे यांचा सन्मान

डोंगरज (प्रतिनिधी) : डोंगरज गावचे सुपुत्र आणि जि. प. प्रा. शाळा डोंगरजचे माजी विद्यार्थी श्री. निलेश सुमन राजाराम कुंभारे यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेंतर्गत ग्राम आरोग्य निरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल शक्तीदादा डोंगरजकर व भानुदास भैय्या कैलवाड मित्र मंडळाच्या वतीने निलेश कुंभारे व त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरज येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमांस शाळेचे मुख्याध्यापक शेख यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि गावातील मान्यवर व अबालवृद्ध तसेच मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.