भा.ज.पा.ओबीसी सेल शहराध्यक्षपदी मोतीलाल डोईजोडे

उदगीर (एल.पी.उगीले) भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी विभागाच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल डोईजोडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदी बालाजी पुंड रा. वाढवणा व तालुका सरचिटणीस पदी राम कदम यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे,माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल भैया निडवदे,माजी उपनगरा ध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक ऍड दत्ता पाटील, नगरसेवक आनंद बुंदे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष रामेश्वर चांडेश्वरे, संगम अष्टुरे, माजी पंचायत समिती सभापती विजयकुमार पाटील, रवींद्र कणगीरे, सुदर्शन माने, युवा मोर्चा जिल्हाप्रसिद्धी प्रमुख प्रसाद नाईकवाडे, युवा मोर्चा शहरउपाध्यक्ष आकाश सावरगावे केशव कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.