पुस्तकांशी मैत्री करा देदीप्यमान यश मिळेल – सुरेखा गुजलवार

उदगीर (एल.पी.उगीले) येथील
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात जागतिक पुस्तक दिनाच्या आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना प्रसिद्ध साहित्यिका सुरेखा गुजलवार म्हणाल्या, विद्यार्थ्यांनो पुस्तकांशी मैत्री करा, म्हणजे जीवनात देदिप्यमान यश मिळेल.यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बसवराज पाटील नागराळकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध लेखिका सुरेखा गुजलवार, प्राचार्य वसंत कुलकर्णी, रुक्मिणी पाटील, प्रा. सीमा मेहत्रे, उज्वला वडले, शिक्षण निदेशक सुधीर गायकवाड हे उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.
पूढे बोलताना सुरेखा गुजलवार म्हणाल्या, जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा. वाचन, प्रकाशन आणि कॉपिराईटला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना द्वारे आयोजित केलेला हा वार्षिक कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांनी नियमित पुस्तकांचे वाचन करुन आपले ध्येय साध्य करावे. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर पुरक साहित्याचे वाचन करणे आवश्यक आहे. सैनिकी विद्यालयाचे विद्यार्थी उद्याच्या राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत.
अध्यक्षिय समारोपात बसवराज पाटील म्हणाले, लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्य सर्वच लेखकांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, ज्ञान संग्रह करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करावे. इ. 8 वी अ वर्गातील कृष्णा मुळे या विद्यार्थ्याने पुरक ग्रंथ वाचन करुन विचार व्यक्त केल्याबद्दल त्याला एक हजार शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड यांनी केले, तर आभार उज्वला वडले यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर गायकवाड, श्रीकांत देवणीकर, शिवकुमार कोळ्ळे, विजय कावळे, विनायक करेवाड यांनी सहकार्य केले.