वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवी संत : डॉ. रामप्रसाद लखोटीया

डॉ. रामप्रसाद लखोटीया यांच्या जीवनकार्यावर आधारीत ” वैद्यकीय समाजसेवेचा दिपस्तंभ ” हे पूस्तक अलीकडेच वाचण्यात आले. विविध सेवेत अभ्यासू, व्यासंगी, समाजसेवी, पर्यावरणीय, राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक सेवेत कार्यरत असलेल्या लेखकांच्या लेखाचा हा संग्रह आहे.
डॉ. रामप्रसाद लखोटीया यांची जन्मभूमी तोरणा आहे. शिक्षण व कर्मभूमी उदगीर आहे. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी उदगीर येथे कोमल हॉस्पिटलची सुरुवात केली.डॉ. लखोटीया यांचे कार्य व्यापक आहे. वैद्यकीय सेवा करीत असताना त्यांनी टाइम्स पब्लिक स्कूल आणि दिव्यांगासाठी शाळा चालवत आहेत. लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे कार्य ही उतुंग असून कर्नाटक, आंध्रप्रदेश, मराठवाडा प्रदेशातील जनतेच्या सेवेच्या कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. नेत्र रुग्णांना दृष्टी देण्याचे महान कार्य त्यांच्या कठोर परिश्रमातून होत आहे. “रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ” मानून निष्काम, निःस्वार्थपणे ते कार्यात असतात.गोरक्षण संस्था, हरित उदगीर सुंदर उदगीर, व्याख्यानमाला आदी कार्यही ते करीत असतात. गोरक्षण संस्थेत जवळपास 400 गायी यांचे पालनपोषण करतात. त्यांचे यातही योगदान आहे. ध्येयाने प्रेरित होवून दानशूर, सेवाभावी अशा व्यक्तीचे टीमवर्क आहे. सर्वच निःस्वार्थपणे कार्य करीत असतात. मराठवाडा जनता विकास परिषद शाखा उदगीरचे ते अध्यक्ष असून यातही त्यांचे कार्य महत्वाचे आहे. विधायक व रचनात्मक समाज विकासाच्या कार्यात ते सातत्याने कार्यरत असतात. जल संवर्धन, वृक्षारोपण, दूरच्या रेल्वेसाठी उदगीर थांबा तसेच प्रवाशांची सोय व्हावी म्हणून प्रयत्नशील असतात.
डॉ. लखोटीया यांनी सर्वसामान्याच्या आरोग्यासाठी शिबीरे आयोजित केली आहेत. नेत्र रोग निदान, कुष्ट रोगनिदान रक्तदान इत्यादीसाठी सतत कार्यशील असतात. दिपस्तंभ मधील प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांचा समाजसेवेचा अग्निहोत्र : डॉ. रामप्रसाद लखोटीया हा लेख उत्तमोतम व वाचनीय आहे. पुस्तकाचे संपादक व लेखक किशन उगले यांचे संपादकीय व लेख उत्कृष्ठ आहे. साहित्यिक पत्रकार शंकर बोईनवाड यांची पाठराखण व लेख उत्तम आहे. वाचक संवादचे आयोजक अनंत कदम यांचा उदगीरभूषण हा लेखही सुंदर आहे. मा. श्री. प्रल्हाद बाहेती यांचा काव्यमय लेख वाचकांसाठी मेजवानीच आहे. साहित्यिक पत्रकार एल. पी. उगिले, जेवळीकर या मान्यवरांचे लेखही उत्तमोतम आहेत. एकूण सर्वच लेख उत्तम आहेत. वाचनीय व उदबोधक आहेत. या पुस्तकात एकूण 19 लेख आहेत. एकूण 75 पेज आहेत. लेखक व समीक्षक किशन उगले यांनी संपादित केलेले हे पुस्तक उत्कृष्ट असे असून सर्वांच्या संग्रहित असावे असा हा दिपस्तंभ अंक आहे. लेखकांच्या पुढील लिखानासाठी शुभेच्छा देतो.
आर. जी. नरले
सेवानिवृत प्राचार्य
उदगीर