जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्य बसव भजन,बसव पोवाडा व वचन गायन स्पर्धा

उदगीर (एल पी उगीले) येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त जागर समतेचा उपक्रम अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बसव भजन, बसव पोवाडा व वचन गायन स्पर्धेचे आयोजन उदगीर येथे करण्यायाचे योजीले आहे.दिनांक 27 एप्रिल 2025 रोज रविवादर उदगीर येथे श्री सद्गुरु हावगीस्वामी वीरशैव लिंगायत भवन, बिदर रोड येथे भव्य बसव भजन, बसव पोवाडा व वचन गायन स्पर्धा होणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटक ष.ब्र.डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक गणेश बेळंबे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच समाजातील ज्येष्ठ नेते, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे पहिले बक्षीस रक्कम रु.21,000/- मा. बसवराज पाटील कोळखेडकर, दुसरे बक्षीस रक्कम रू.15,000/-, डॉ. वडगावे एच व्ही, तिसरे बक्षीस रक्कम रू. 11,000/- प्रा. संतोष तोडकर व अॅड. निशांत वाघमारे व तसेच दासोह श्री रामशेट्टे प्रकाश कंटेप्पा साकोळकर यांच्या तर्फे आहे.
या स्पर्धेचे आयोजक जगतज्योती महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान, उदगीर यांनी उदगीर परिसरातील सर्व नागरिकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.तरी सर्व स्पर्धकांनी संयोजन समितीकडे संपर्क साधुन आपले नाव नोंदवावे.