बँकिंग व अनुषंगिक क्षेत्रांमध्ये कृषी पदवीधरांसाठी अमाप संधी प्रशांत ढोले

उदगीर (एल पी उगिले) वसंतराव नाईक मराठवाङा कृषि विद्यापीठाशी संलग्नित उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी तांडा येथील कृषि महाविद्यालयातील , विद्यार्थी समुपदेशन व रोजगार, नौकरी कक्षा मार्फत , बी.एस्सी. (मानद ) कृषि पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी ” बँकिंग व अनुषंगिक क्षेत्रांमध्ये कृषी पदवीधरां साठी रोजगाराच्या, नोकरीच्या संधी ” याविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंगदराव सूर्यवंशी,उपप्राचार्य डॉ. अशोक पाटील,संकल्प शिक्षण संस्थेचे छत्रपती संभाजी नगर येथील तज्ञ मार्गदर्शक प्रशांत ढोले, सतीश जगताप ,शरद वानखेडे , डॉ. एस.एन. वानोळे यांच्या हस्ते दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व वंदन करून , या मार्गदर्शनपर शिबिराची सुरुवात झाली .
प्रास्ताविक प्रा. सचिन खंडागळे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक प्रशांत ढोले यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून रोजगाराच्या अमाप संधी , राष्ट्रीयकृत व खाजगी बँका, अनुषंगिक क्षेत्रांमध्ये कृषी पदवीधरांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले.विद्यार्थ्यांची आपले ध्येय आताच निश्चित करून दृढ संकल्प करावा, आणि कठीण परिश्रम करून आयुष्यात यशस्वी व्हावे.विविध स्पर्धा परीक्षा जसे की, लोकसेवा आयोग, यूपीएससी , बँकिंग, स्टाफ सिलेक्शन , नाबार्ड, एफसीआय, कृषी सेवा, वन सेवा, सीडब्ल्यूसी इत्यादींची पूर्वतयारी करण्याचा मौलिक सल्ला दिला . तदनंतर,सतीश जगताप यांनी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने परीक्षेची तयारी करावी,अभ्यासक्रमातिल विविध घटकाची माहिती दिली, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, चालू घडामोडी याबाबत सखोल मार्गदर्शन केले . राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारी करण्यासाठी, केंद्र व राज्य सरकार तर्फे विविध शिष्यवृत्ती योजनां उपलब्ध असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अंगदराव सूर्यवंशी यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवून विविध स्पर्धा पक्षाची पूर्वतयारी करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले .
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे डीडीओ. डॉ.आनंद दापकेकर, प्रा सुरेश नवले , डॉ. एस.एन. वानोळे, डॉ. डी. जी. पानपट्टे आणि समस्त प्राध्यापक व कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्याने लाभले.
त्याचबरोबर , या कार्यक्रमास डॉ. वसीम शेख ,डॉ के. पी. जाधव, प्रा. बी.बी. निम्मणवाड, प्रा. पी.एल. सोळंके, प्रा.आशा आडलिंगे, प्रा.ऐ.टी. गीते आणि महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक, कार्यालयीन व प्रक्षेत्रावरील कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन खंडागळे यांनी केले आणि डॉ सागर खटके यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.