मारवाडी युवा मंच तर्फे बस स्थानकात प्रवाश्यांसाठी थंड पाण्याची सोय

उदगीर (एल.पी.उगिले) उदगीर बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाश्यांची पाण्यासाठी होणारी हेळसांड पाहून येथील मारवाडी युवा मंच च्या वतीने प्रति वर्षी प्रमाणे प्रवाशा साठी थंड पाण्याची पानपोई मारवाडी युवा मंचच्या वतीने सुरुवात केली आहे. या पाणपोईच उद्घाटन स्थानक प्रमुख पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस समाजसेवक तथा युवा मंच चे मार्गदर्शक डॉ. रामप्रसाद लाखोटिया, महेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी, लक्ष्मीनारायण लोया मंच अध्यक्ष गोविंद मुंदडा,सचिव उमेश कालानी,पूर्व अध्यक्ष शिरीष नावंदर, लक्ष्मीकांत सोमाणी, पवन मुंदडा,अमर सारडा, कोषाध्यक्ष अनुप बजाज,गणेश बजाज सह युवा मंचचे सर्व पदाधिकार तथा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते, या वेळेस रामप्रसाद लाखोटिया म्हणाले की, मारवाडी युवा मंच ने प्रवाशांची हेळसांड लक्षात घेऊन हे उपक्रम चालू केले असून दररोज हजारो प्रवाशांसाठी थंड पाणी उपलब्ध करून दिले आहे. जनतेने ते थंड पाणी बाटली मध्ये भरून न घेता तेथे असलेल्या ग्लास ने पाणी प्यावे. जेणे करून जास्तीत जास्त प्रवाश्यांना पिण्यास थंड पाणी मिळेल,जेवढे थंड पण लागेल ते युवा मंच पुरवठा करेल. असेही स्पष्ट केले.