सोमनाथपुर ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल पी उगिले): तालुक्यातील सोमनाथपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सोमनाथपूरच्या सरपंच अंबिका पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उदगीरच्या सिडीपीओ आशा सुर्यवंशी यांचा शाल व पुष्पहार देवून ग्रामसेवक अवकाश पवार यांनी सत्कार केला . तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमीत्त सदस्या शिवकर्णा अंधारे यांच्या वतीने लिपिक सुषमा वाघमारे, ग्राम रोजगार सेवक अविनाश वाघमारे, धनराज कांबळे, व ग्रामपंचायत येथील सेवक राजु राठोड, अविनाश चव्हाण, योगेश राठोड, कन्हैया श्रीवास्तव, प्रल्हाद राठोड, संतोष पवार यांचा कामगार दिना निमीत्त शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अंबिका पवार, ग्रामसेवक अवकाश पवार, उपसरपंच अमित माडे, उदगीरच्या सिडीपीओ आशा सुर्यवंशी, अंगणवाडीच्या निरीक्षक तूपरपे अश्वीनी, निडेबने , सदस्या शिवकर्णा अंधारे, सुजीता चव्हाण, लक्ष्मण आडे, ज्ञानोबा पवार, अभिनव शिंदे, अश्विनी घोगरे, प्रभु आडे, राजु वैजापूरे सह सर्व सदस्य, सदस्या, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या व ग्रामस्थ आदीं मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ग्रामसेवक अवकाश पवार यांनी तर आभार उपसरपंच आमीत माडे यांनी मानले.