औसा शहरातील वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या 2 रस्त्यांचे आणि 9 सार्वजनिक स्वच्छतागृहांचे लोकार्पण.

औसा (एल पी उगिले) शहरातील वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या ‘जुने बसस्थानक, औसा ते उंबडगा’ या सिमेंट रस्त्याचे आणि ‘ग्रामीण रुग्णालय, औसा ते कारंजे खडी केंद्र’ या रस्त्याचे लोकार्पण पालकमंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री महोदयांच्याच हस्ते औसा शहरातील जुन्या बस स्थानकापासून मुक्तेश्वर मंदिरापर्यंतच्या सिमेंट नाली कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. औसा शहरातील नागरिकांना लातूर शहराशी जोडणारे 2 पर्यायी रस्ते औसेकरांच्या सेवेत रुजू झाले आहेत.
पालकमंत्री महोदयांच्या हस्ते औसा शहरातील 9 सार्वजनिक स्वच्छतागृहां चे लोकार्पणही करण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने सार्वजनिक स्वच्छतागृहे असलेली औसा ही राज्यातील क दर्जाची एकमेव नगरपालिका ठरली आहे. औसा शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि खरेदीसाठी येणाऱ्या माता भगिनींची सार्वजनिक स्वच्छतागृहां अभावी होणारी ससेहोलपट थांबणार आहे.
औसा शहराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. अभिमन्यू पवार यांनी दिली कटिबद्ध आहे.