उदगीर शहरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये घाणीचे साम्राज्य, नगर परिषदेचे दुर्लक्ष

उदगीर (एल पी उगिले) : शहरात प्रभाग क्रमांक.७ मध्ये आठणे गल्ली येथे २ दिवसा पासून रस्त्यावर गटारीचे घाण पाणी साचलेले आहे. तरी याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे.
गटारी तुडुंब भरल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येत आहे त्यावरूनच नागरिकांना ये, जा करावी लागत आहे.
घाण पाणी रस्त्यावर साचू लागल्याने परिसरात दुर्गंध पसरू लागली आहे. तसेच या घाण पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपरिषदेने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने नगर परिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्याकडे तक्रार करून देखील ते कोणतीही कार्यवाही करण्यास तयार नाहीत.
घर पट्टी, नळपट्टी वेळेवर भरून देखील नागरिकांना अडचण येत आहे, अशी ओरड नागरिकांतून होऊ लागली आहे. प्रशासनचे पण याकडे जाणून पूर्वक दुर्लक्ष होत आहे की काय? नियोजन शून्य कारभारामुळे सतत रस्ते खोदण्याचे काम होत असल्याने आणि गुत्तेदार पोचणच्या उपक्रमांतर्गत पुन्हा पुन्हा रस्ते आणि नाल्याचे दुरुस्तीचे नाटक केले जात असल्याने कधीकधी नाल्यांची उंची रस्त्या पेक्षा जास्त असल्याने लहानपणी रस्त्यावरच साचलेले दिसून येते तर काही ठिकाणी नाल्याची स्वच्छता न झाल्यामुळे नालीतील पाणी रस्त्यावर येताना दिसून येत आहे. एकंदरीत आंधळे दळते कुत्रे पीठ खाते अशी अवस्था सध्या प्रशासनाचे झाल्याचे दिसून येत आहे.
प्रभागात रस्ते करून एक वर्षही झाले नव्हते तोच जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन साठी रस्ते मध्यभागातून खोदण्यात आले आहेत. पाईपलाईन केल्यानंतर रस्ते बुजवण्यात आले मात्र ते पूर्वत बनवण्यात आले नाहीत. जलजीवन योजना काम पूर्ण झाल्याचे सांगत गुत्तेदार बिले उचलून पसार झाल्याची चर्चा आहे मात्र रस्त्याचे काम अर्धवट तसेच राहिले आहे त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होऊ लागला आहे. रस्ते ओबडधोबड झाल्यामुळे आणि नाल्या तुंबल्यामुळे घाण पाणी साचू लागले आहे याचे गांभीर्य प्रशासनाने वेळीच लक्षात घ्यावे, अशी विनंती नागरिकाच्या वतीने करण्यात येऊ लागली आहे.
कोणत्याही गटारीचे साफ सफाई नीट प्रकारे होत नाहीत. सफाई कर्मचारी फक्त घराचे कचरा घेऊन जात आहेत. पण गटारी भरून आले तरी त्या गटारी कडे दुर्लक्ष करत आहेत. जर प्रशासन व नगरपरिषदेने याकडे लक्ष नाही घातल्यास, या भागातील जनता आंदोलन व उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे. म्हणून नगर परिषदेने याकडे वेळीच लक्ष घालून, या भागातील होणारी नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.