कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा येथे बँक खाते जागरूकता कार्यक्रम संपन्न

0
कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा येथे बँक खाते जागरूकता कार्यक्रम संपन्न

उदगीर (एल पी उगिले) : कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर आणि कॅनरा बँक, उदगीर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने “बँक खाते जागरूकता कार्यक्रम आणि विद्यार्थी खात्याच्या सुविधा” या विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कॅनरा बँकेचे शाखा व्यवस्थापक निरज पॉल आणि शाखा अधिकारी गजानन बोगुलवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी . सूर्यवंशी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी बँकिंग क्षेत्रातील जागरूकतेचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांसाठी बँक खात्याच्या सुविधांचा उपयोग यावर प्रकाश टाकला. यानंतर निरज पॉल यांनी बँक खात्याच्या विविध प्रकारांबद्दल माहिती दिली. त्यांनी विशेषतः विद्यार्थी खात्याच्या वैशिष्ट्यांवर भर दिला, ज्यात शून्य शिल्लक खाते, ऑनलाइन बँकिंग, डेबिट कार्ड, आणि शैक्षणिक कर्जाच्या सुविधांचा समावेश आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल बँकिंगच्या सुरक्षित वापराबद्दलही मार्गदर्शन केले, आणि सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. गजानन बोगुलवार यांनी विद्यार्थ्यांना बचत खात्याचे फायदे, बँकिंग प्रक्रियेची सुलभता आणि आर्थिक नियोजनाचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित बचत आणि आर्थिक शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच, कॅनरा बँकेच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विशेष योजनांबद्दलही त्यांनी माहिती दिली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक गरजांसाठी बँकिंग सुविधांचा लाभ घेता येईल.या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. त्याचबरोबर महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी तसेच डॉ. विजय शिंदे, डॉ. शिवशंकर वानोळे आदी प्राध्यापक गण आणि कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या व्याख्याना दरम्यान विचारलेल्या प्रश्नांना बँकेच्या प्रतिनिधींनी समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने प्रा. सचिन खंडागळे यांनी बँकेच्या प्रतिनिधींचे आभार मानण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये बँकिंग जागरूकता वाढवण्यात आणि त्यांना आर्थिक साक्षरतेकडे प्रेरित करण्यात यशस्वी ठरला. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक बँकिंग सुविधांचा लाभ घेण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!