शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी, छावा संघटनेच्या वतीने आंदोलन

उदगीर (एल.पी. उगिले) : अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या रस्ता आणि न्याय मागणीच्या संदर्भामध्ये उदगीर येथील उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता शेकडो कार्यकर्ते व शेतकरी यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. तसेच राज्य सरकारला न्याय मागण्यासाठी प्रा. राजेश चव्हाण यांनी आपल्या भाषणातून सविस्तर माहिती देऊन या मागण्या मान्य करण्याचे निवेदन दिले. यावेळी उत्तम बिरादार, छावा जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, तालुकाध्यक्ष मनोज पाटील, विशाल देवणे, शहराध्यक्ष विजय पाटील, दलित संघटनेचे नेते नितीन भैया एकुरकेकर, आकाश कस्तुरे, लोकनेते बापूसाहेब कांबळे या सर्वांचे सविस्तर असे मार्गदर्शन झाले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे, अशा मागण्यासह, उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्या कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यात उपस्थिती असलेले हाश्मी, टायगर सेनेचे जॅकी दादा सावंत, प्रा. धनराज बिरादार लोहारकर तसेच विविध संघटनेने पाठिंबा देऊन, आंदोलन यशस्वी करण्यात आले.