दिगंबर भाऊराव माने यांची भाजपाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीच्या मेळाव्याचे २३ जूलै २०२१ रोजी राजानारायणलाल लाहोटी स्कूल येथे आयोजीत करण्यात आले होते. यावेळी जिल्हयातील कार्यकारिणी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. लातूर येथील सामाजीक कार्यकर्ते श्री दिगंबर भाऊराव माने यांची यावेळी लातूर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली त्यांना लातूर शहर जिल्हा अध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनीष बंडेवार (जिल्हा सरचिटणीस), शैलेश लाहोटी(प्रदेश कार्यकारिणी सदस्य), शैलेश गोजमगुंडे (मनपा गटनेते), देविदास काळे (माजी उपमहापौर), प्रेरणा होनराव (पक्ष प्रवक्या), अजीत पाटील कव्हेकर(जिल्हाध्यक्ष भाजपा युवामोर्चा),स्वातीताई जाधव(महाराष्ट्र प्रदेश महिला कार्यकारिणी उपाध्यक्षा), प्रवीण सावंत, दिग्वीजय काथवटे (जिल्हा सरचिटणीस) आदिंची प्रमुख उपस्थिती होती. श्री माने यांच्या निवडबद्दल श्रीराम कुलकर्णी (जिल्हा उपाध्यक्ष), भगवंत कुलकर्णी, सुरेशजी पेन्सलवार (भाग्यलक्ष्मी बँक सल्लागार), रत्नाकर मोकासे, प्रभाकर शिरूरे, काकासाहेब घुटे, विशाल हवापाटील, सतीष ठाकूर, गजानन चौधरी, अनंत पाटील, सुभाष कांबळे, राजाराम साखरे, डॉ. सुदाम देसाई, बालाजी व्हतांळे सरपंच, ज्ञानेश्वर हिंगे, संजय देशपांडे, सी.एम. अग्रवाल, हावन्ना साहेब, शेख शकूर, व्यंकटराव उंदरे, राजन दिक्षीत, ऍड. अनंत दूरे, पांडूरंग राजकुंवर आदिनी त्यांच्या भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.