सिध्देश्वर चौकातील रक्तदान शिबीरात 101 जणांचे रक्तदान
लातूर (प्रतिनिधी) : शहरातील सिध्देश्वर चौक गाव भागातील परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मगर यांच्या पुढाकारातून वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्च्याचे शहर जिलहाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 101 जणांनी रक्तदान केलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सामाजिक बांधिलकीतून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला पदाधिकारी व कार्यकर्त्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या या सामाजिक कार्याचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
सध्या जगभरात कोरोनाचे संकट आल्यामुळे सर्वसामान्य जनतेवर वाईट दिवस आलेले आहेत. अशा परिस्थितीत रक्तदानाची गरज असतानाही रक्तदानासाठी कोणीही पुढे येत नाही. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक बांधीलकीच्या दृष्टिकोणातून ज्ञानेेश्वर मगर यांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर, मनपा आरोग्य सभापती अनिल शिंदे, विनोद मस्के, सागर घोडके, पंकज देशपांडे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या रक्तदान शिबीरात 101 जणांनी रक्तदान हेच जीवदान समजून रक्तदान केले.
यावेळी पंकज शिंदे, बंटी गवारे, सौदागर घोलप, शंकर मगर, सचिन ऐतनबोने, आकाश घोलप, निलेश कांबळे, साहिल शेख, मंगेश मठपती, स्वप्निल गायकवाड, प्रदिप पवार, राजु आडसूळे, विकास मगर, शंभू आरागडे, महेश ईगवे, सौरभ दासरे, पवन शिंदे, दिपक राठोड, विवेक मस्के, गोपाळ मगर, दिपक मस्के, अविनाश मगर, पंकज मगर, खंडू मगर, आनंद मगर, रितेश बुरले, सुजीत गायकवाड, अभी नागमोडे, निखील कदम, सुरज भोसले, जयतोष सोमवंशी आदी पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.