समाजशील निखिल शिवाजी गायकवाड यांना समाजभुषण पुरस्कार!
लातूर (प्रतिनिधी) : कोविड १९ च्या काळात विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. त्याचाच एक भाग म्हणून साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी आणि सीमाबंदी करण्यात आली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांचे, हातावर पोट असलेल्या कामगारांचे हाल होत होते. अशा अडचणीच्या प्रसंगी तरुण कार्यकर्ते निखिल गायकवाड यांनी हडको प्रभागातील लोकांच्या घरोघर जाऊन दैनंदिन भाजीपाल्याचे मोफत वाटप सुरू केले आहे. समाजकारण काय असते हे दाखवून देणाऱ्या निखिल गायकवाड यांच्या कार्याला ‘सलाम तुझ्या कार्यला भावा’ असे अभिप्रायही जनतेने दिला. समाजसेवेचा ध्यास घेतलेले निखिल गायकवाड आणि त्यांच्या ग्रूप ने कडक लॅाकडॉऊन मध्ये रमाई अन्नसेवा योजनेच्या माध्यमातुन दररोज पाचशेहून अधिक डब्बे कोव्हिड रुग्णाच्या नातेवाईकाना पुरविले. बौध्द जंयती निमित्त लातूर शहरातील बौध्द विहारात मोतीचूर लाडूचे वाटप केले. कोव्हिड १९ काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निखिल शिवाजी गायकवाड यांची निवड झाली. कोरोना संसर्गाचा धोका ओळखून लोकांना जमा करण्यापेक्षा सामाजिक अंतर राखून आंबेडकर पार्क येथे एलईडी बोर्ड लावला.घरावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या जिवाची परवा न करता कडक लॅाकडाऊन मध्ये आजारी लोकांची व त्याच्या नातेवाईकांची सेवा करणा-या निखिल गायकवाड आणि संपूर्ण ग्रूपला सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष प्रदीप पाटील खंडपुरकर, माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर महानगरपालिका महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मुख्यलेखा व वित्तअधिकारी रत्नराज जवळगेकर,पूजा नीचळे, आकाश गडगडे, विशाल सावंत, गजू गुगळे यांनी पाठबळ दिले. अशा सामाजिक कार्याची दखल घेवून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन तर्फे समाजभूषण पुरस्कार देवून निखील शिवाजी गायकवाड अध्यक्ष डॅा.बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सव समिती २०२१ यांना गौरवण्यात आले. या अतुलनीय कार्याबद्दल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.