रसूल पठाण यांच्या बालकथा:स्वरूप व व्याप्ती ग्रंथास पसायदान पुरस्कार.

उदगीर: तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले रसूल दा. पठाण यांच्या बालकथा:स्वरूप व व्याप्ती ग्रंथास गुहागर जि. रत्नागिरी येथील पसायदान प्रतिष्ठानचा अत्यंत मानानाचा पसायदान पुरस्कार जाहीर झाला आहे.
तीन हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापूर येथे ११ मे २०२५ रोजी आयोजित २४ वे छ. शंभुराजे समाजप्रबोधन ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात हिंदीतील प्रसिद्ध व ज्येष्ठ साहित्यिक गोपाल (सहर) शर्मा यांचा हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रसूल पठाण यांचे एकूण पाच पुस्तके प्रकाशित असून बालसाहित्यात त्यांची विशेष अभिरुची आहे. प्रतिष्ठित पसायदान पुरस्कार रसूल पठाण यांना जाहीर झाल्याबद्दल मसापचे केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, अ. भा. मराठी नाट्य परिषद शाखा, उदगीरचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विलास सिंदगीकर, पर्यवेक्षक सिध्दार्थ बोडके, संस्थासदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, बालसाहित्यिक संजय ऐलवाड, रामदास केदार, धनंजय गुडसूरकर, अनिता यलमटे, लक्ष्मण बेंबडे, प्रा. बिभीषण मद्देवाड, निता मोरे, सिद्धार्थ सुर्यवंशी आदिंनी अभिनंदन केले आहे.