३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी संमेलनासाठी वर्षाराणी मुस्कावाड यांच्या कवितेची निवड

उदगीर (प्रतिनिधी)
सातारा जिल्ह्यातील कराड येथे होत असलेल्या ३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कोदळी येथील शांतिनिकेतन विद्यालयातील सहशिक्षिका , नवोदित कवयित्री तथा साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड यांची निमंत्रितात निवड झाली आहे.
या संमेलानाचे उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार असून अध्यक्ष साहित्यिक प्रविण
गायकवाड तर स्वागताध्यक्ष सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खा. उदयनराजे भोसले, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, आ डॉ. अतुल भोसले प्रमूख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाचे प्रमुख निमंत्रक डॉ. शरद गोरे यांनी परिश्रम घेतले आहे. दि. .९ व १० मे रोजी असे दोन दिवस हे संमेलन पार पडणार आहे.
या साहित्य संमेलनात कवयित्री वर्षा मुस्कावाड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षक विश्वनाथ मुडपे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर पाटील, प्रा. कुमार बंडे, प्रा धनराज बंडे व इतर मान्यवरांनी केले आहे.