तोंडार येथे राजशेखर शिवाचार्य महाराज यांचे पाद्य पुजा संपन्न
तोंडार (प्रतिनिधी) : गरु पोर्णीमेचे औचित्य साधून गत विस विस वर्षा पासुन तोंडार ते अहमदपुर (भक्तीस्थल) दिंडीची परपंरा चालु आहे. तीच परंपरा वसुधंरारत्न राष्ट्रसंत परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा दैवाक्य झाल्याने त्याचे उत्तराधिकारी राजशेखर शिवाचार्य महाराज व गुरुवर्य भगत महाराज यांची तोंडार येथील बालाजी मारोती बिरादार (गुरुजी) याचा परिवारा तर्फे शिवाचार्याचा व भगत महाराज याचा शाल फेटा, व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, व तद्नंतर त्याची पाद्यपूजा करण्यात आली.गत वर्षी ही परंपरा ही कोरोणा चा प्रादुर्भावामुले स्थगित ठेवली होती, परंतु उतरत चालेला संसर्ग पाहता शासनाचा नियमाचे पालन करत ही पद यात्रा कायम ठेवून दि: 22/7/21 रोजी राजशेखर शिवाचार्य महाराज व भगत महाराज यांची ढोल ताशा, फटाक्यांचा आवाजात व टाल म्रदंगाचा गजरात गावातुन मिरवणूक काढण्यात आली, व त्या नंतर बालाजी मारोतीराव बिरादार (गुरुजी) याचा घरी शिवाचार्य राजशेखर महाराज व भगत महाराज यांची पाद्य पुजा व आरती करण्यात आली, व आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले, या कार्यक्रमासाठी उदगीर लिंगायत समाजाचे अध्यक्ष सहकार महर्षी चंदर अण्णा वैजापुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती सिद्धेश्वर पाटील, लिंगायत समाजाचे राजकुमार बिरादार बामणीकर, मा.आ.मनोहर पटवारी, प्रशांत धुलशेट्टे, शेतकरी बिग्रेड चे वक्ते दत्ता खंकरे,ई मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांचा शाल श्रिफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार बिरादार परिवाराचा वतीने करण्यात आला. या वेळी माजी उपसरपंच निलप्पा बिरादार, शिवराज बिरादार, चंद्रकांत हैबतपुरे, शि. भ.प रतिकांत स्वामी, माधव पाटील, सुशीलकुमार पटवारी, राम पाटील, माधव पटवारी ,शिवाजी हैबतपुरे, सुदंरी साडी सेटंर चे भीमाशंकर मिरजगावे, ई नागरिकांसह अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते.कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी वैजनाथ फुलारी, भाऊराव हैबतपुरे, अझर राठोड, शंकर रोड्डेवाड, विजय गाजुरे,संग्राम हैबतपुरे, प्रवीण हैबतपुरे यानी परिश्रम घेतले.