वाढवणा येथील जिल्हा परिषदांच्या शाळेत जून पासुन उर्दूचा वर्ग सुरु करण्याची मान्यता द्यावी -मागणी

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. हे गाव बारा हजार लोक संख्येचे असुन वाढवणा (बु.)वाढवणा खुर्द, किनी यल्लादेवी,डांगेवाडी या गावात मोठया संख्येने मुस्लिम समाज असुन वाढवण्यात फक्त एकच उर्दू प्राथमिक शाळा अनुदानित असुन त्या शाळेतील विध्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक काहीच फायदा झाला नाही.
शाळेत असुविधा असल्यामुळे पुढील उर्दूत शिक्षण उदगीरलाच असल्यामुळे गोरगरीब अशिक्षित पालकांनी पुढील शिक्षणाला पुर्ण विराम दिला, कारण गरिबी दारिद्र्यता मुळे पुढील शिक्षणाच्या खर्च झेपत नसल्यामुळे असंख्य तरुणांचे जिवन बरबाद झाले. 30 वर्ष फक्त 7 वी पर्यंत च शाळा असल्यामुळे विध्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. त्या असंख्य मुलां मुलींचे शैक्षणिक नुकसान तर झालेच झाले आता विना अनुदानित 8 वी, 9 वी, 10 वी पर्यंत वर्ग सुरु केले आहेत. मात्र या अगोदर 30 वर्ष फक्त 7 वी पर्यँतच शाळा होती. त्यामुळे अर्धवट शिक्षण घेऊन असंख्य विध्यार्थी विध्यार्थिनी मोलजुरी करून संसाराचा गाडा हाकू लागले आहेत.
40 वर्षांपासून उर्दू शाळा आहे, मात्र त्या शाळेतील सोसायटीचे हेवेदाव्यात तू अध्यक्ष का मी अध्यक्ष, मी सेक्रेटरी का तू सेक्रेटरी म्हणुन कोर्टात आपआपसात सदस्यांची 30 वर्षांपासून भांडण चालू असल्यामुळे शाळेकडे बघणारे कोणीच नसल्याने शिक्षक कधी येतात? तर कधी दांडी मारतात. हमखास प्रार्थनेला तर एक ते दोनच शिक्षक दिसत असतात. काही शिक्षक मुख्यालयी राहात नाहीत, या मुळे शाळेकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे मुख्याध्यापक शिक्षकावर कुणाचाच दबाव नसल्यामुळे विध्यार्थी विद्यार्थिनींना नीट लिहिता वाचता येत नाही. मुख्याध्यापक शिक्षकांची पगार चालू आणि गावातील असंख्य विध्यार्यांचे अर्धवट शिक्षणामुळे नुकसान तर झालेच, एकहि विध्यार्थी विध्यार्थिनींना कमी शिक्षना मुळे शासकीय नोकरी तर मिळालीच नाही कुणी व्यवसाय देखील करू शकले नाहीत. कुणी हॉटेल मध्ये वेटर तर कुणी मिस्त्री,तर कुणी भाजी पाला विकून उपजीविका भागवीत आहेत. मुली मात्र दिल्या घरी संसार करीत आहेत
सद्या 40 वर्ष झाले तरी शाळेची अर्धवट इमारत, रंगरंगोटीचा अभाव भौतिक सुविधेचा अभाव,संगणकाचा अभाव,स्वछ पाण्याचा अभाव, पोषण आहार देखील मेनू प्रमाणे दिले जात नाही.