मौजे करडखेल येथे ग्राम दरबारचे आयोजन

उदगीर (प्रतिनिधी) ग्रामपंचायत कार्यालय करडखेल येथे एक दिवस गावकऱ्यासोबत या उपक्रमांतर्गत ग्राम दरबारचे आयोजन करण्यात आलेले होते. पंचायत समिती कार्यालय उदगीर व ग्रामपंचायत कार्यालय करडखेलच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सौ.पार्वती मुसने या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर , डॉ. विजयकुमार घोनसीकर, डॉ. सचिन येवते, सचिन पाटील , केदासी कृषी अधिकारी, व्यंकटेश दंडे विस्तार अधिकारी, विजयकुमार अजने, वि.अ.कृषी, यांच्यासह पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी हजर होते. प्रत्येकांनी राबवल्या जाणाऱ्या योजना विषयी ग्रामस्थांना सखोल असे मार्गदर्शन केले, व योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच याप्रसंगी प्रल्हाद कानुरे ग्रामपंचायत अधिकारी ग्राम पंचायत कार्यालय करडखेल, गिरीश राघू उपसरपंच, नामदेव मुळे सामाजिक कार्यकर्ते, मिलिंद कसबे, सोमेश्वर कांबळे, अमित भंडारे, दिलीप निडवंचे इत्यादी उपस्थित होते.