भारतीय सैन्य व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदगीर मध्ये अभिनंदन

उदगीर (प्रतिनिधी)येथील बहुजन विकास अभियानच्या वतीने, भारतीय तिन्ही सैन्य दल यांनी पाकिस्तानी लष्करी दलाच्या ठिकाणावर हल्ले करून, दहशतवादाची झोप उडवणाऱ्या भारतीय सैनिकाचे व देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून, भारत माता की जयच्या घोषणा देऊन, परिसर दुमदुमून सोडला. भारत हा अन्याय गेल्या 30 वर्षापासून सहन करत आहे. बेळगाव मध्ये 28 निरपराध लोकांचा बळी घेऊन, अतिरेक्याने भारतामध्ये नंगानाच माजवला होता. त्याचे उत्तर भारताने हल्ला करून, भारत कसा आहे, हे दाखवून दिले. या वेळेस बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, शिवाजी मामा करकाळे, रामदास पाटील, अमोल सूर्यवंशी, श्याम सोनकांबळे, गोरख वाघमारे, शेख सरवर, शशिकांत गायकवाड, सुनील पाटील, गंगाधर शेवाळे, मुश्रम मण्यार, शांत पेंटर, राजकुमार कारभारी आदी उपस्थित होते.