राजकुमार कलमे भाजपात स्वगृही परतले

लातूर (एल.पी. उगिले )
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि धडाडीचे कार्यकर्ते राजकुमार कलमे यांनी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पुन्हा प्रवेश करून स्वगृही परतले आहेत.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विकास कामांमुळे प्रेरित होऊन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजकुमार कलमे यांनी शनिवारी सकाळी भाजपा संवाद कार्यालयात आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत भाजपात पुन्हा प्रवेश केला आहे.यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, ओबीसी मोर्चाचे भागवत सोट, पंचायत राज सेलचे नवनाथ भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले, सतीष आंबेकर, प्रकाश पाटील, चंद्रभान जाधव, पद्माकर चिंचोलकर, नानासाहेब कसपटे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.