लोकसभागातून शेत रस्ता खुला करण्याची कुमठा येथून सुरुवात

0
लोकसभागातून शेत रस्ता खुला करण्याची कुमठा येथून सुरुवात

उदगीर (प्रतिनिधी) :-तालुक्यातील कुमठा खुर्द ते लोहारा डांबर रस्त्यापासून पश्चिमेकडे गट नंबर 473 पर्यंत सस्ती अदालत मध्ये आलेल्या अर्जाप्रमाणे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार राम बोरगावकर यांच्या आदेश प्रमाणे रस्ता खुल्ला करण्याची कार्यवाही सुरुवात करण्यात आली आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांना सोबत घेऊन चुना टाकून खुणा करण्यात आल्या. यावेळी सर्व शेतकरी लोकवाटा जमा करून लोकसभागातून माती कामासाठी मशीन लावली. या रस्त्यासाठी या भागातील सर्व शेतकरी उपस्थित होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील केंद्रे व मंडळ अधिकारी पंडित जाधव, ग्राम महसूल अधिकारी सावन ऊळागड्डे यांनी नारळ वाढवून सुरुवात केली. ऍड संजयकुमार केंद्रे, भागवत पाटील, सतीश जाधव, तुळशीदास जाधव, अण्णाराव बिरादार, वामन केंद्रे, लक्ष्मण डिगोळे, सुशील केंद्रे, जीवन केंद्रे, अर्जुन केंद्रे, देवदास जाधव, विष्णू पाटील, मुरलीधर सुवर्णकार, मुकुंद सुवर्णकार, श्रीकांत सुवर्णकार, सुरेश बिरादार, बाळा केंद्रे, हनुमंत माने, दत्ता जाधव इत्यादी उपस्थित होते.
कोणत्या गावातून प्रत्येक लोककल्याणकारी योजना आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी च निर्णय प्रभावीपणे प्रत्यक्ष राबवण्यासाठी सर्व शेतकरी उत्स्फूर्तपणे सहकार्य करत असल्याचे मत युवा नेते तथा ग्रामपंचायत पॅनलचे प्रमुख सुनील केंद्रे यांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!