३१ व्या अ. भा. नवोदित मराठी संमेलनात वर्षाराणी मुस्कावाडच्या कवितेस प्रथम क्रमांक

उदगीर (प्रतिनिधी)
सातारा जिल्ह्यातील कराड येथे संपन्न झालेल्या ३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कोदळी येथील शांतिनिकेतन विद्यालयातील सहशिक्षिका , नवोदित कवयित्री तथा प्रसिद्ध साहित्यिका वर्षाराणी मुस्कावाड यांच्या तू हो जोतिबा माझा या कवितेस प्रथम क्रमांक मिळाला आहे .
या संमेलानाचे प्रमुख निमंत्रक डॉ शरद गोरे यांच्या हस्ते कवयित्री वर्षा मुस्कावाड यांचा सन्मान स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला,यावेळी विचार मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते.या संमेलनात वर्षाराणी मुस्कावाड यांनी जिजाऊ वंदना गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध करुन टाकले.
या साहित्य संमेलनात कवयित्री वर्षा मुस्कावाड यांच्या कवितेस प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षक विश्वनाथ मुडपे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. आशितोष पाटील ,एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, मुख्याध्यापक बालाजी मोरे, मुख्याध्यापक नारायण पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र भोसले, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शिवशंकर पाटील, मनोज पाटील, सावित्रा पाटील,प्रा. कुमार बंडे, प्रा धनराज बंडे व इतर मान्यवरांनी केले आहे.