श्रीकांत पाटील यांच्या वतीने पिटीएच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) येथील
प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये उदगीर तालुका अध्यक्षपदी प्रा.ल.की पाटील, तालुका कार्याध्यक्षपदी प्रा.सिद्राम शेटकार, प्रमुख प्रवक्तेपदी प्रा. शंकर मोरे आणि तालुका सहसंघटकपदी प्रा.पवन सूर्यवंशी यांची निवड झाली आहे. या निमित्य एसपी फ्लेक्सचे मालक श्रीकांत पाटील यांच्या वतीने, प्रा.सिद्धेश्वर पटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्याने निवड झालेल्या या पिटीए पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी अजय शेटकार,प्रा. संजय जामकर , केदार पाटील, प्रा.संतोष चौधरी, प्रा.पांडुरंग काचबा इत्यादी उपस्थित होते.