उदगीर येथे नरसिंह जयंती उत्साहात साजरी

0
उदगीर येथे नरसिंह जयंती उत्साहात साजरी

उदगीर (एल. पी.उगिले) तालुक्यातील मादलापूर शिवारातील साबणे फार्म हाऊस येथील नरसिंह मंदिरात नरसिंह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नरसिंह मंदिरातील पूजा ही भोर सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद साबणे, शिक्षक सेना उद्धव ठाकरे गटाचे प्राचार्य सचिन साबणे, शिवसेना तालुका संघटक व्यंकट साबणे, अनलेश साबणे, नागेंद्र साबणे यांच्या हस्ते पार पाडण्यात आली .
यावेळी उदगीर सामान्य रुग्णालयातील डॉ. अजय महिंद्रकर, डॉ.सौ.महिंद्रकर, वैशाली घोलप, अंबिका पलंगे, जयमाला पालीमकर, अनुराधा साबणे, नीलम थोरात, शारदा रत्नपारखे आदींची उपस्थिती होती. दिवसभरात समर्थ व सरस्वती नगर येथील महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास अनेक भाविक लोक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!