जवळगा जि प प्रशाला दहावीच्या शंभर टक्के निकाल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जवळगा जि प प्रशाला दहावीच्या शंभर टक्के निकाल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील जवळगा जिल्हा परिषद शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून या शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सन्मान करण्यात आला, मार्च 2021 मध्ये घेण्यात आलेल्या एस एस सी परीक्षेत15 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत 20 पैकी सात विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत प्रथम क्रमांक आरती धनाजी जाधव 96 पॉईंट 40% द्वितीय क्रमांक टोपे क्षितीजा बंडोपंत 96 पॉईंट वीस टक्के तृतीय क्रमांक प्रतिज्ञा यशवंत सोनकांबळे 94 टक्के गुण मिळाले आहेत यावेळी आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प हार देऊन सत्कार करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक चव्हाण सर प्रमुख पाहुणे म्हणून नवयुवक सरपंच श्री हनुमंत बिरादार श्री रमेश वाघ व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री यशवंत सोनकांबळे तथा संजय गांधी कमिटी देवनी, श्री विठ्ठल केंद्रे सर, मनोज सर परमेश्वर माळी सर आनंद कदम सर श्रीमती सुडे मॅडम पालक शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते शाळेच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

About The Author

error: Content is protected !!