केंद्रेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने तननाशक फवारणी
अहमदपूर (गोविंद काळे) : ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडी यांच्या वतीने गावातील रिकाम्या जागा, उद्यान, जिल्हा परिषद शाळेचा परिसर, स्मशान भूमी चा परिसर तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने अनावश्यक वाढलेल्या तनाची वाढ थांबवण्यासाठी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी माजी सभापती सौ. अयोध्याताई केंद्रे व लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य मार्गदर्शक अशोक काका केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व गावच्या सरपंच ज्योती माधव केंद्रे व उपसरपंच ज्योती बालाजी केंद्रे तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक माधव केंद्रे तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळू केंद्रे, भानुदास गुरुजी केंद्रे,भानुदास केंद्रे . प्रकाश केंद्रे ,तुकाराम केंद्रे यांच्या सर्वांच्या सहकार्यातून गावांमध्ये तन नाशक फवारणी करण्यात आली यामध्ये केंद्रेवाडी चे सुपुत्र मारुती गुरुजी यांनी आपल्या गावासाठी ट्रॅक्टर गाव फवारणीसाठी मोफत दिला व गावातील सर्व रिकाम्या जागी अनावश्यक वाढलेल्या तणाची तननाशकद्वारे फवारणी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सेवक सुधाकर केंद्रे यांनी फवारले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक नारायण अण्णा केंद्रे, श्रीराम महाराज केंद्रे, उत्तम केंद्रे, नाथराव केंद्रे, नारायण अण्णा केंद्रे ,शिवाजी दराडे मामा, शांताराम केंद्रे चेअरमन शिवहार केंद्रे ,धनंजय महाराज, बाळू भाऊ केंद्रे, सुधाकर केंद्रे, विनोद केंद्रे, धर्मराज केंद्रे ,नागनाथ केंद्रे रामदास केंद्रे, गंगाधर केंद्रे, नागोराव केंद्रे आदींची उपस्थिती मध्ये गावाची तन नाशक फवारणी करण्यात आली.