किनगाव येथील अनेक कार्यकर्त्यांचा आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

किनगाव येथील अनेक कार्यकर्त्यांचा आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना कानमंत्र
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील किनगाव येथील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये रफिक गपूरसाहेब शेख, माजी उपसरपंच, किनगाव हाजी निजामचाचा शेख, मंजूर शेख, अमित पाशा, सुभाष साठे ग्रा.पं. सदस्य असिफ तांबोळी, खय्युम मोमीन, चांद बागवान, अन्सार सय्यद, रहीम भाई, फिरोज भवनी, ऑटो युनिअन अध्यक्ष नारायण सावरगावे, रज्जाक सय्यद, गोविंद जोशी, खादर बागवान, इब्राहिम पटेल, दौलत कांबळे, रवी चाटे, भास्कर वाघमारे, ताहेर शेख, रहिम तांबोळी, नामदेव पिटले, अरबाज शेख, केशव बोडके आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आ. बाबासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत. सर्व जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालून आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट कारण्याचा कानमंत्र दिला. त्याचबरोबर येणार्‍या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकीत आपली ताकद वाढवून जास्तीत जास्त जागेवर विजय मिळवीत. मतदारसंघातील विकासाला चालना देण्यासाठी हा पक्ष प्रवेश महत्वाचा आहे. तसेच कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा व एकजुटीने काम करा असे मतही आ.पाटील यांनी मांडले.
यावेळी कृ.उ.बा. सभापती तथा जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगने, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि.प.सदस्य माधवराव जाधव, तालुका कार्याध्यक्ष सुंदरराव साखरे, माजी सरपंच सुभाष मुंडे, शिवाजीराव खांडेकर, दयानंद पाटील, रामभाऊ बोडके, प्रा.व्ही.एस. पवार, माऊली बोडके, दिलदार शेख, राजाभाऊ शिंदे पाटील, मुजावर देशमुख, रामभाऊ मुंगे, प्रभाकरराव क्षीरसागर, विष्णू आबा आदटराव, मनोहर स्वामी, भरत भाऊ शिंदे, व्यंकटराव वंगे, गणेश दहिफळे यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!