दावणगाव वि.का.सेवा सोसायटीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

दावणगाव वि.का.सेवा सोसायटीच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील दावणगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्याह वतीने पोलीस दलात सेवेत असणारे दावणगावचे भुमीपुत्रांची  पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबाबत व यावर्षी दहावी परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या गुंणवंताचा आणि फिजिक्स या विषयात एम. एस. सी. करुन त्याच विषयात सेट परीक्षा उतीर्ण झालेल्या अशा सर्व गुणवंताचा सत्कार दावणगाव येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदीरात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. बाबूराव  भंडे हे होते. गुणवंताचा सत्कार  स्वातंत्र्य सैनिक गोरखनाथ भंडे यांच्या हस्ते करण्यात आला तर प्रमुख उपस्थिती म्हणून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक उमाजी मुळे,  चेअरमन रमेश भंडे, व्हा. चेअरमन धनाजीराव मुळे  , शिवाजीराव भोळे, बालाजी फुले, सुरेश भंडे, कालिदास भंडे, हे होते.
यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
व्यंकटराव मुळे, प्रकाश भोळे, संजीव जबाडे, तुळशीदास मुरुमकर, बालाजी जबाडे, यांचा तर केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती झालाले रमेश जाधव यांचा प्राचार्य डब्ल्यू. एस. कांबळे याच्यासह गुणवंत विद्यार्थी म्हणुन अक्षय मुंगळे, सुनिल ढगे, आदित्य भंडे, गीतांजली जवळगेकर, भंडे निलाक्षी, मयुरी भोसले, इंदिरा हुपळे, आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किशनराव बिरादार तर आभार पंडित हुरुदनाळे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमलाकर फुले, संतोष पताळे, रणजित भंडे, बालाजी हुरूसनाळे, बळीराम मुळे, सुरज भंडे, शुभम पताळे, अमर पवार, दिपक भंडे, विजयकुमार पताळे,ऋषी बिरादार, सोपान महापुरे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!