लातूर जिल्हा बँकेत शेतकऱ्यांनी भरला २४ कोटी रुपयांचा पिक विमा

लातूर जिल्हा बँकेत शेतकऱ्यांनी भरला २४ कोटी रुपयांचा पिक विमा

राज्यात लातूर बँक पिक विमा भरून घेण्यात अव्वलस्थानी

लातूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१ योजनेअंतर्गत जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १११ शाखेत तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांनी २३ कोटी ४२ लाख रुपयांचा विम्याचा हप्ता भरणा केलेला असून त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्हाभरात शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी स्थानिक पातळीवरील सोसायटी कार्यालयात पिक विमा भरून घेतला होता  राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कोविड १९  काळात सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांच्या गावातून पिक विमा भरून घेवून राज्यात लातूर जिल्हा बँकेने नवा पॅटर्न निर्माण केला आहे हे विशेष आहे दरम्यान जिल्ह्यांत पिक विमा भरण्यासाठी कुठलीही तक्रार न करता सुट्टीच्या दिवशीही बँक कर्मचारी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या गावातून पिक विमा स्वीकारलेला आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असून  गेल्या वर्षी कोवि ड ची परीस्थिती असताना लोकांच्या मदतीला बँक धावून गेली होती पुन्हा यावर्षी पिक विमा रक्कम भरण्यासाठी त्यांच्या गावात जावून विमा रक्कम स्वीकारली आहे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असलेली लातूरची जिल्हा बँकेने  एक वेगळेपण जपले आहे  बँकेच्या माध्यमांतून मुख्यालयातील अनेक अधिकारी कर्मचारी ग्रामीण भागातील नियुक्त केले होते त्यामूळे लोकांना पिक विमा भरून घेण्यासाठी कुठलाही त्रास होऊ दिला नाही त्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव सर्व संचालक मंडळाच्या यांच्या सूचनेनुसार अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत.

*जिल्ह्यात तालुका  व्हाइज पिक विमा भरलेली रक्कम व शेतकरी सभासद याप्रमाणे आहेत*

(१)लातूर तालुका पिक विमा रक्कम (३ कोटी २९ लाख ९२ हजार रुपये)  शेतकरी सभासद ३४ हजार २९,
(२) रेणापूर तालुका रक्कम (१ कोटी ३० लाख ८ हजार रुपये) शेतकरी सभासद १४ हजार ७४६
(३) औसा तालुका  रक्कम(३ कोटी ६६ लाख ८९ हजार ) सभासद ४४ हजार ३४.
(४) निलंगा तालुका रक्कम (३ कोटी ५३ लाख ८९ हजार) सभासद संख्या ४४ हजार ७५८
(५)  चाकुर तालुका रक्कम (३ कोटी १३ लाख ८५ हजार) सभासद संख्या ३७ हजार ५९
(६) अहमदपूर तालुका रक्कम (२ कोटी ४१ लाख ५६ हजार) सभासद संख्या २१,१८८
(७) उदगीर तालुका रक्कम (२ कोटी ७२ लाख ६० हजार) सभासद संख्या २५ , ३०३
(८) देवणी तालुका रक्कम ( १ कोटी २० लाख ८५ हजार) सभासद संख्या १३, हजार ८३९
(९) जळकोट तालुका रक्कम (८० लाख ८८ हजार रुपये) सभासद संख्या १० हजार ५६०
(१०) शिरूर अनंतपाळ तालुका रक्कम (१ कोटी ३१ लाख ८० हजार रुपये)  शेतकरी सभासद १५ हजार ६५१  अशा एकूण २ लाख ६१ हजार १६८ शेतकऱ्यांनी २३ कोटी रुपये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत २३ जुलै अखेर बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून भरणा केला अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे यांनी दिली.

About The Author