दयानंद अॅनिमेशनची पुर्वा शहा कॅनला बेस्ड मल्टीनॅशनल कंपनीत
लातूर (प्रतिनिधी) : दयांनद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यलायामध्ये शैक्षणिक वर्ष 2009 पासून सुरु असलेल्या अॅनीमेशन विभागातील विद्यार्थी देश-विदेशात वेगवेगळया नामांकित स्टुडियोमध्ये मोठया हुद्यावर कार्य करत आहेत. त्यापैकीच एक पूर्वा शहा/जैन ही विद्यार्थीनी नुकतीच कॅनडा बेस्ड स्कॅनलाईन व्हि.एफ.एक्स स्टुडियो मध्ये रुजू झाली आहे. हे महाविद्यालयाच्या दृष्टीने गौरवाची बाब असून तिच्या ज्ञानाचा महाविद्यालयातील शिक्षणाचा उपयोग सध्या अॅनीमेशन विभागात शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना व्हावा या निमित्ताने दि. 24 रोजी एकदिवसीय Online Webinar चे आयोजन करण्यात आले . यावेळी बोलतांना पूर्वा शहा/जैन यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
बोलतांना त्या म्हणाल्या की, माझे शिक्षण इयत्ता 12वी दयानंद वाणिज्य महाविद्यालयात झाले. त्यांनी वाणिज्य शाखा सोडून कला शाखेतील व्यावसायीक अॅनीमेशन अभ्यासक्रमास प्रवेश घेतला व तिच्या व्यक्तीमत्त्वाला कलाटणी मिळाली. तिने अॅनीमेशन विभागाचे कौतुक करून ती कशी घडली याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले. आजही लॉकडॉऊनच्या काळात अॅनीमेशन विषयात नौकरी व व्यवसायाच्या संधी भरपूर उपलब्ध आहेत. फक्त मेहनत व कष्ट करण्याची जिद्द असावी लागते. आंतराष्ट्रीय कंपन्या अशा मुलांच्या शोधात आहेत. मुलांना कंपनी पर्यंत जाण्याची गरज नाही तर कंपनीच त्यांच्यापर्यंत येईल असे त्यांनी प्रतिपादन केले. काही कारणास्तव सहा महिन्याची रजा घेतल्यानंतर परत पूर्व कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर मला पुन्हा सिध्द करावयास सांगण्यात आले. तर मी विचार केला सिध्दच करावयाचे असेल तर मी दुसऱ्या कंपनीत सिध्द करेल असा आत्मविश्वास माझ्यामध्ये अॅनीमेशन विभागाने उत्पन्न केला. तिने व्ही.एफ. एक्स. इंण्डस्ट्रीमध्ये सी.जे. कंपोझीटर, रोटो पेंट आर्टीस्ट, व्ही.एफ. एक्स.रोटो सुपरवाझर, टीम लिडर, अॅक्ट्रेस अशा विविध पदांवर आपले ठसे उमटविले आहेत. तिने बऱ्याच प्रसिध्द हॉलीवुड व बॉलीवुड चित्रपटातील व्ही.एफ. एक्स. ची कामे करून क्रिडीट आपल्या नावे केली आहेत. त्यामध्ये गार्डीय ऑफ द गॅलक्सी, थॉर:द डार्क् वल्ड, कॅप्टन अमेरीका:द विटंर सोल्जर, प्रेसी जॅकसन 2, ब्रोकन हॉर्सेस, पोस्टमॅन पॅट, एक थी डायन, भुतनाथ रिर्टन्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेस बक्षी, बॉम्बे वेलवेट, शमीताब, पीके, द हंगर गेम्स पार्ट 2, फास्ट अॅण्ड फ्युरीयस 7, टर्मीनेटर जेन्सीस, स्पेक्टर, मिशन इम्पॉसीबल, बॅटमॅन व्हर्सेस सुपर मॅन, द हंट्स मॅन, वंडर वुमेन, एव्हेन्जर्स इन्फीनीटी वॉर, द किंग, वंडर वुमेन 1984 अशा एक ना अनेक मुव्हीजची व्ही.एफ. एक्स.ची कामे तिने केली आहेत.
ऑनलाईन वेबीनारच्या संदर्भात प्रास्तावीक मांडतांना अॅनीमेशन विभाग प्रमुख प्रा. दूर्गा शर्मा यांनी अॅनीमेशन विभागाने असे अनेक विद्यार्थी घडविले आहेत. या वेबीनारच्या निमित्ताने पूर्वा शहा/ जैन यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळयासमोर ठेवावा तसेच त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला आसल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले. दयानंद शिक्षण संस्था तसेच प्राचार्य आम्हांला नेहमीच प्रोत्साहीत करत असतात असेही त्या म्हणाल्या.
या ऑनलाईन वेबीनारच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड यांनी पूर्वा शहा ही महाविद्यालयाची आयकॉन आहे. असे अनेक आयकॉन अॅनीमेशन विभागामध्ये घडले आहेत आणि अॅनीमेशन विभागाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या वेळी आपल्याला घडविण्यामध्ये दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदजी सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, अॅनीमेशन विभागप्रमुख प्रा. दूर्गा शर्मा, प्रा. इरफान शेख, प्रा. सचिन पतंगे, प्रा. संतोष काकडे, प्रा. मंगेश रापते आदींनी चांगल्या पध्दतीचे मार्गदर्शन लाभल्यामुळेच मला अशा मोठया कंपनीमध्ये लॉकडाऊनच्या काळात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी दयानंद कला महाविद्यालयाचे मनापासून आभार व्यक्त करते अशी भावना पूर्वा शहा /जैन यांनी व्यक्त केले. त्यांचा महाविद्यालयातर्फे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले व तिला पुढील वाटचालीसाठी संस्था व महाविद्यालयतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.