प्रा.द.मा.माने यांच्या कृषी शब्दधन व मिरगाचा पाऊस राहुरी व औरंगाबाद विद्यापीठाकडून दखल

प्रा.द.मा.माने यांच्या कृषी शब्दधन व मिरगाचा पाऊस राहुरी व औरंगाबाद विद्यापीठाकडून दखल

शिरुर ताजबंद (गोविंद काळे) : येथील प्रा.द.मा.माने लिखित कृषी शब्दधन व मिरगाचा पाऊस महात्मा कृषी विद्यापीठ, राहूरी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी प्रा. माने यांच्या पुस्तकाची दखल घेतली असून विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी ग्रंथालयात वरिल पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. “कृषी शब्दधन” पुस्तकात कृषी जीवनातील अवजारे व साधने, उपयोगी वस्तू,जमीन व शेती यांचे विविध प्रकार,शेतीचे व धान्याचे मोजमाप,पिकांचे प्रकार, भाजीपाला, झाडे, झुडुपे, किड, जनावरे आणि त्यांचे खाल्लं, त्यांचे रोग, प्राणी, पक्षी, नक्षत्रे, सण, उत्सव इत्यादी संबंधित शब्दांची व्युत्पत्ती व माहीती सविस्तर देण्यात आली असून संशोधन करणार्‍यांना विद्यार्थ्यांना ही पुस्तके मार्गदर्शन ठरतील अशा प्रकारचे पत्र दोन्ही विद्यापीठांकडून प्रा.लेखक माने यांना पाठवली आहेत.

About The Author