“क्या हुआ तेरा वादा” म्हणत निलंगा येथे आमदार निलंगेकर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन

0
"क्या हुआ तेरा वादा" म्हणत निलंगा येथे आमदार निलंगेकर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन

निलंगा :– (प्रतिनिधी)
शेतकऱ्याची कर्जमाफी असेल किंवा लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन देण्याचा वादा असेल सोयाबीनचा हमीभाव दीडपट करण्याचा वादा असेल अशा अनेक खोटे आश्वासने देऊन सत्ता मिळवणाऱ्या महायुती सरकारला केलेल्या वाद्याची आठवण करून देण्यासाठी लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वात निलंगा चे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना क्या हुआ तेरा वादा म्हणत निलंगा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन देण्यात आले.
निवडणूक काळामध्ये भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्र पक्षांनी जनतेला भूलथापा देत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि सन्मान योजनेतून 15 हजार रुपये देणार लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 रुपये देणार 45000 गावात पानंद रस्ते बांधतात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील एस जी एस टी अनुदानाच्या स्वरूपात परत करू व एक रुपयात पिक विमा योजना चालू ठेवू वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये देणार अन्नदाता बनेल ऊर्जादाता म्हणत शेतीला 24 तास वीज देऊ शेतमालाला हमीभाव देऊ बी बियाणे खताच्या किमती नियंत्रित ठेवू हर घर जल हर घर छत योजना कार्यान्वित ठेवू मराठवाडा वॉटर ग्रीड केंद्राकडून मान्यता घेऊ असे अनेक आश्वासने देऊन या महायुती सरकारने सत्ता मिळवली खरी पण दिलेला वादा न पाळतात जनतेची घोर फसवणूक केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा म्हणत मराठवाडा भर आंदोलन पेटवण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज निलंगा येथील भाजपाचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन क्या हुआ वादा म्हणत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली . यावेळी शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख नामदेव मामा चाळक जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटिका डॉक्टर शोभाताई बेंजर्गे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दिनेश जावळे तालुकाप्रमुख अविनाश रेशमे भागवत वंगे शिवाजी चव्हाण माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे उपतालुकाप्रमुख अमोल ढोरेसिंगे शहर प्रमुख सुनील नाईकवाडे लखन बोंडगे शिवाजीराव पांढरे लायक भाई शेख संतोष मोघे गफार भाई लाल टेकडी शरीफ भाई पठाण सतीश फट्टे मनोज तांबाळे महिला आघाडीच्या तालुका संघटिका रेखाताई पुजारी शहर संघटिका दैवताताई सगर अरुणाताई माने पार्वती ताई भिसे मंगलबाई कांबळे प्रणिता ताई कांबळे यांच्यासह असंख्य शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!