मनोजकुमार शर्मा यांना पीएचडी प्रदान

0
मनोजकुमार शर्मा यांना पीएचडी प्रदान

मनोजकुमार शर्मा यांना पीएचडी प्रदान

मुंबई : मनोजकुमार सुभाष शर्मा यांनी हिंदी विषयात ’21 वीं सदीं के प्रमुख हिंदी उपन्यासों में चित्रित मजदूर वर्ग का अध्ययन (सन् 2001-2020 तक) ’ या विषयावर प्रो डॉ. गौतम बी. सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केल्याने मुंबई विद्यापीठाने मनोजकुमार शर्मा यांना पीएचडी पदवी प्रदान केली आहे.
या संशोधनात यांनी रोजंदारी मजूर, महिला मजूर, बालकामगार, खाणकाम करणारे, सफाई कामगार, हातगाडी कामगार, रस्त्यावरील विक्रेते इत्यादी सर्व मजुरांच्या परिस्थितीचा साहित्यिक आणि वास्तविक दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. पाटकर वर्दे महाविद्यालय, मुंबईच्या प्राचार्या डॉ .प्रतिभा गायकवाड यांनी मनोजकुमार शर्मा यांना पीएच.डी अवॉर्ड झाल्याने त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पाटकर महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!