विकासाचा वाटा संपूर्ण मतदारसंघांला देणार – सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील

0
विकासाचा वाटा संपूर्ण मतदारसंघांला देणार - सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील

विकासाचा वाटा संपूर्ण मतदारसंघांला देणार - सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : विकास करत असताना विकासाचा वाटा संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावागावापर्यंत वाडी- तांडा पर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातील
अंधोरी येथे केले.
अंधोरी येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराज राजस्व समाधान शिबीर कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मंजुषाताई लटपटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उज्वलाताई पांगरकर , गटविकास अधिकारी पंकज शेळके, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, अंधोरी सरपंच प्रफुल्लाताई ब्रिंगने, आर.एफ.ओ शिल्पाताई गित्ते, उपअभियंता महावितरण राठोड पंडित, बालविकास अधिकारी राजेश गझलवाड, चेअरमन बापूराव सारोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजीराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी गणेश जाधव, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, सरपंच येलदरी विक्रम गुट्टे, राजपाल पाटील, सरपंच सुधीर गुट्टे, प्रफुल्ल गुंडरे, बाळू पाटील, नायब तहसीलदार अभिलाष जगताप, मुन्वर मुजावर, संजय भोसीकर, शुभांगी जवादे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.शिरसागर, स्थानिक ग्रामस्थ, अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की तालुक्यातील अनेक स्मशानभूमीचा प्रश्न सध्या आपण निकाली काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण झाल्याने मतदार संघातन दळण वळणाची सुविधा निर्माण झालेली आहे. आपल्या तालुक्यात सर्व महिला अधिकारी असून त्यांचे कार्य उत्कृष्ट आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज आता सौर ऊर्जा प्रकल्पामुळे भेटणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भविष्यात जास्त दर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवले आहेत. मुख्यमंत्र्यास सहाय्यता निधीतून अनेक रुग्णांना शासनाची मदत होत असते. अहमदपूर येथे अनेक प्रशासकीय इमारीतेचा प्रश्न सोडवला गेला आहे. आज वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आवश्यक्य आहे. आपण सर्वांनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा असेही नामदार पाटील म्हणाले.
आज ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा कार्यक्रम होते ही शाळा अत्यंत बोलकी असून ,गावातील इतर गुणवंताचे कौतुक सुद्धा ना. पाटील यांनी केले. अंधोरी हे कबड्डीपटूचे गाव असून भविष्यात येथे कबड्डी स्टेडियम करणार असल्याचा शब्द सुद्धा नामदार पाटील यांनी दिला.
यावेळी तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने विविध विभागाचे स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलमध्ये आधार कार्ड अपडेट करणे, मतदार ओळखपत्र देणे, महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले , तालुका अंतर्गत वृक्ष लागवडीचा शुभारंभ, जल पुनर्भरन कार्यक्रम, संजय गांधी व वृद्धपकाळ योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले, जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत शेतकऱ्याच्या वारसांना सातबारा देण्यात आला. रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, ई शिधापत्रिका, बेबी केअर किट वाटप, कृषी विभागामार्फत पूर्वसंमती पत्र वाटप, करण्यात आले. यावेळी विविध स्टॉलला सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी भेट देऊन विविध विभागाच्या योजनेची माहिती घेतली.
आंधोरी गावातील काही लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप नामदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी केला. कार्यक्रमाचे आभार नायब तहसीलदार अभिलाष जगताप यांनी मानले.
कार्यक्रमास अंधोरी गावातील गावातील नागरिकांची व महिला वर्गांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!