अहमदपूर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

0
अहमदपूर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

अहमदपूर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

अहमदपूर (गोविंद काळे) : जिल्हाधिकारी यांच्या आदेशनुसार सन २०२५ ते २०३० या कालावधीतील गठीत होणाऱ्या अहमदपूर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत अहमदपूर उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत ११ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. मध्यवर्तीय प्रशासक इमारत बैठक हॉल अहमदपूर येथे ही सोडत होणार आहे.

अहमदपूर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायातींपैकी १९ ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव राहणार असून यापैकी १० पदे अनुसूचित जातीमधील महिलांसाठी राखीव राहतील. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ३ सरपंच पदे राखीव असतील, यापैकी २ पद अनुसूचित जमातीमधील महिलेसाठी राखीव राहील. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २६ पदे राखीव ठेवण्यात येणार असून यापैकी १३ पदे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतील. उर्वरित ४९ ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच राहतील, यापैकी २५ सरपंच पदे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राहतील.

अहमदपूर तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी या आरक्षण सोडत बैठकीस उपस्थित रहावे, असे अहमदपूरच्या तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी कळविले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!