भक्ती स्थळावर भक्तांची मदियाली सन्मार्ग दाखवणारा गुरु देवा पेक्षाही श्रेष्ठ- राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य भक्ती स्थळावर भक्तांचा मेळा
भक्ती स्थळावर भक्तांची मदियाली सन्मार्ग दाखवणारा गुरु देवा पेक्षाही श्रेष्ठ- राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य भक्ती स्थळावर भक्तांचा मेळा
अहमदपूर (गोविंद काळे) : गुरुपौर्णिमेनिमित्त भक्ती स्थळावर भक्तांची मांदळीच झाली होती गुरुराज माऊली शंकराच्या गजरामध्ये अनेक दिंड्या पताका घेऊन भक्ती स्थळावर हजारो भक्तगण दाखल झाले. यावेळी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे उत्तर अधिकारी यांनी सन्मार्ग दाखवणारा सद्गुरु हा देवा पेक्षा श्रेष्ठ आहे आणि नंतरच्या सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक म्हणून आपल्या जीवनात सद्गुरु महत्त्वाचा आहे त्यांच्या मार्गदर्शनाने आपण जीवन सफल करून घेऊ शकतो. अध्यात्मिक क्षेत्रात सदगुरु मूळ असून विज्ञानाच्या क्षेत्रात ज्ञान हा गुरू आहे. त्यामुळे सर्व मानवाच्या सकल कल्याणासाठी सद्गुरु महत्त्वाचा मानला जातो असे त्यांनी म्हटले. यावेळी भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी महाराज, किर्तन केसरी भगवंतराव पाटील चांभारगेकर, शिवा संघटनेचे उमाकांत शेटे,दत्ताभाऊ खंकरे,रतिकांत स्वामी तोंडारकर,चंद्रकांत हैबतपुर यांचे मार्गदर्शन झाले. सकाळच्या सत्रात राष्ट्रसंतांच्या समाधीसमोर राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या वतीने तीर्थप्रसाद देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रसंतांच्या पादुकांची पालखी मिरवणूक भक्ती स्थळावर काढण्यात आले.तदनंतर शिवभक्त परायण मारुती भालके जळकोटकर यांचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी मेनकुदळे परिवार अहमदपूर तसेच कळसे परिवार उदगीर यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आला. सौ. विजया पाटील पुणे,वीरभद्र
तोंडचिरकर,रावणगावकर यांच्या वतीने ही भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनमथआप्पा पालापुरे, शिवलिंग पाटील,विश्वनाथ शेटे, नीलकंठ बिराजदार, वर्षाताई देशमुख विश्वस्त मंडळाचे शिवप्रसाद गोरे, एडव्होकेट बाबुराव देशमुख, सुप्रिया घोटे, शीलाताई शेटकर, यांच्यासह हजारो भक्तगण उपस्थित होते.
दिंड्यांच्या आगमन… राष्ट्रसंतांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी उदगीर, तोंडार, वाढवणा,लोहारा, किनी कद्दू मुक्रमाबाद,मंगनाळी,शिरूर ताजबंद, बाराळी, हंडरगुळी सह शेकडो गावातील भक्तगण पायी दिंडीच्या माध्यमातून भक्ती स्थळावर आले होते.
दर्शनासाठी रांगा राष्ट्रसंतांच्या संजीवन समाधीचे दर्शन वर्षातून दोन वेळेस होत असते त्यात गुरुपौर्णिमा व राष्ट्रसंतांचा जन्मोत्सव 25 फेब्रुवारी यांचा समावेश असतो.आज गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी सहा पासूनच दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने आंध्रप्रदेश, कर्नाटक तेलंगाना व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून भक्तगण दाखल झाले होते.यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव उपजिल्हाधिकारी सौ. मंजुषा लटपटे,तहसीलदार उज्वला पांगरकर,कृषी अधिकारी सचिन बावगे, नगरपरिषद चे मुख्याधिकारी संतोष लोमटे, उपविभागीय अभियंता गोविंद भोसले, ओम पुणे, शिवकुमार उडगे, अभय मिरकले, रवी महाजन सह हजारो भक्त यांनी रांगेत दर्शन घेतले.
थेट बस सेवा अहमदपूर आगारातून 9 जुलै व आज गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांसाठी दोन बसेसची व्यवस्था करण्यात आली. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने ही पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
