माझ्या शैक्षणिक यशात महात्मा फुले महाविद्यालयाचा मोलाचा वाटा – वर्षा लगडे माळी

0
माझ्या शैक्षणिक यशात महात्मा फुले महाविद्यालयाचा मोलाचा वाटा - वर्षा लगडे माळी

माझ्या शैक्षणिक यशात महात्मा फुले महाविद्यालयाचा मोलाचा वाटा - वर्षा लगडे माळी

अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षकाची नोकरी करीत करीत एम. ए. संस्कृत,व एम.ए. मराठी दोन्ही पारंपरिक विद्यापीठातून एम.ए आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अंतर्गत अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रातून बी.एड. करीत करीत एम.ए. मराठी मध्ये उन्हाळी मे-जून २०२५ च्या परीक्षेत ७३ टक्के गुण प्राप्त केलेल्या आदर्श शिक्षिका वर्षा लगडे माळी यांनी माझ्या शैक्षणिक यशात महात्मा फुले महाविद्यालयाचा मोलाचा वाटा असल्याचे म्हटले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या वतीने घेण्यात आलेल्या मे जून २०२५ च्या पदव्युत्तर परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून त्यात महात्मा फुले महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रातून एम.ए. मराठी या विषयामध्ये अहमदपूर येथील यशवंत विद्यालयातील आदर्श शिक्षिका वर्षा लगडे माळी यांनी यामध्ये ७३ टक्के गुण संपादन केले आहे.
वर्षा लगडे माळी यांच्या या यशाबद्दल त्यांचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र महात्मा फुले महाविद्यालयाचे केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयात सत्कार आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत महात्मा फुले महाविद्यालयाचा वाटा मोलाचा असून मला या गुणवतेला पात्र बनवले, मार्गदर्शन केले तसेच माझ्या सुख दुःखात सहभागी झाले असे भावोद्गारही व्यक्त केले.
यावेळी वर्षा लगडे माळी यांची कन्या वेदिका प्रभाकर माळी ही डॉक्टर ऑफ फार्मसी च्या परीक्षेत ८५ टक्के गुण घेतल्यामुळे सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी त्यांना मार्गदर्शन करणारे मुक्त अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे, केंद्र सहाय्यक डॉ. संतोष पाटील डॉ. सतीश ससाणे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, प्रा.प्रकाश गायकवाड, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंदू धुमाळे , शिवाजी चोपडे आदिंची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!