अहमदपूर पोलीस डीबी पथकाची उत्कृष्ट कामगिरीकाळ्या बाजारात जाणारा तांदुळाचा ट्रक पकडला, नमुना तपासणीसाठी पाठवला

0
अहमदपूर पोलीस डीबी पथकाची उत्कृष्ट कामगिरीकाळ्या बाजारात जाणारा तांदुळाचा ट्रक पकडला, नमुना तपासणीसाठी पाठवला

अहमदपूर ( गोविंद काळे ) स्थानिक पोलिसांच्या डीबी पथकाने एक मोठी कारवाई करत काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदुळाचा ट्रक पकडला आहे. ही कारवाई लातुर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून, यामुळे काळ्या बाजारातील रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

          याविषयी सविस्तर माहीती अशी की, लातुर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी अवैद्य धंद्यांना आळा घालण्याच्या  जिह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सक्त सुचना दिल्या आहेत चार दिवसापुर्वी  गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले पोलीस निरिक्षक बि.डि भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक आनंद श्रीमंगल, पोह तानाजी आरदवड, पोह गंगाधर चपडे, पोकॉ इंद्राळे, कांबळवाड, सारोळे आदीच्या पथकाने अहमदपूर- नांदेड हायवेवरील शेनी पाटी जवळ सापळा रचून एम.एच 06 ई वाय 0770 हा क्रमांक असलेला ट्रक पकडला. 
            या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ भरलेला होता. हा तांदूळ रेशनचा (रेशनचा तांदूळ) असून, तो अवैध मार्गाने विक्रीसाठी नेला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. यामुळे, पोलिसांनी तांदळाच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी ते अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडे  पाठवले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल असे पोलीसांनी सांगीतले
        या कारवाईत अनेक पोती तांदूळ आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे. यामुळे, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ही कामगिरी अहमदपूर पोलीस ठाण्याच्या  डीबी पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून, यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!