सदृढ आरोग्यासाठी महिलांना सकस आहाराची गरज – डॉ. भाग्यश्री घाळे

0
सदृढ आरोग्यासाठी महिलांना सकस आहाराची गरज - डॉ. भाग्यश्री घाळे

उदगीर (प्रतिनिधी) किशोरवयीन मुलींनी व महिलांनी मासिकधर्मामध्ये योग्य काळजी घेवून आपले आरोग्य सांभाळले पाहिजे, सदृढ आरोग्यासाठी महिलांना सकस आहाराची गरज असते. असे प्रतिपादन डॉ. भाग्यश्री घाळे यांनी केले.
त्या वीरशैव समाज उदगीरच्या वतीने धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित ९१ वा
वचन सप्ताहाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. यावेळी ९१ व्या वचन सप्ताहाचे पहिले पुष्प डॉ. भाग्यश्री विरभद्र घाळे यांनी गोखले. महिलांचे आरोग्य या विषयावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी संग्राम स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंगद हक्के
होते. व्यासपीठावर वीरशैव समाजाचे
कोषाध्यक्ष सुभाष धनुरे यांची उपस्थिती होती. प्रारंभी जगतज्योती
महात्मा बसवेश्वर व
ॲड. धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ. घाळे यांनी, टि.व्ही. आणि मोबाईलच्या अतिवापरांमुळे किशोरवयीन मुलींचे व महिलांचे
मानसिक आरोग्य धोक्यात आले असल्याचे नमूद केले. मोबाईल व टीव्ही पासून दुर राहुन आपले मानसिक आरोग्य सक्षम ठेवावे,
मोबाईलच्या अतिवापरामुळे व त्यातील अश्लिल सामुग्रीमुळे मुलींचे हार्मोनस जास्त स्त्रवत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
त्याचप्रमाणे सौंदर्य प्रसाधनाच्या अतिवापरामुळे बाजारातील तळीव व जलद खाद्यपदार्थ खाल्यामुळे महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक
अंगद हक्के यांनी, महिलांनी संसाराच्या गराड्यात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या आरोग्यकडे सजगतेने पाहावे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. महेश
मळगे यांनी केले. सुत्रसंचलन
उत्तरा कलबुर्गे यांनी केले.
आभार रविंद्र हसरगुंडे यांनी मानले. कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!