युवा नेते बाळासाहेब पाटोदे यांच्या वाढदिवसानिमित्त संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
उदगीर (एल पी उगिले) नगरीतील दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेले, युवा नेते बाळासाहेब पाटोदे यांच्या वाढदिवसानिमित्त, संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर उदगीर येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी सतीश पाटील मानकीकर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उदगीर परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये मदतीचा हातभार लावावा या उद्देशाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
आपल्या परिसरातील कोणताही विद्यार्थी हा शिक्षणासाठी कोठेही मागे पडू नये, विद्यार्थ्यांचा विकास म्हणजेच आपल्या भारत देशाचा विकास हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सतीश पाटील मानकीकर मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन एक सामाजिक उपक्रम राबवण्याच्या संकल्पनेतून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव निटूरे, शाळेच्या मुख्याध्यापिका जगताप अनिता, सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील मानकीकर, उदगीर नगरीतील युवा नेते अंकुश ताटपल्ले पाटील, भाकसखेडा गावचे नागरिक तुकाराम भाऊ मोरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी सर्व बालचिमुकल्यांनी बाळासाहेब पाटोदे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुढील आयुष्य निरोगी, आरोग्य संपन्न, व भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजक सतीश पाटील माननिकर मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शाळेच्या वतीने पर्यावरण संरक्षणचा दृष्टीकोन समोर ठेऊन प्राथमिक स्वरूपात 5 वृक्ष शाळेच्या वतीने भेट देण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एस बिरादार यांनी केले व आभार प्रदर्शन श्याम कुलकर्णी यांनी केले.
यावेळी गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शैक्षणिक साहित्य मिळाल्याने आनंद पाहायला मिळत होता.
