गाजलेल्या बलात्कार प्रकरणातील सहआरोपी विकास राठोड याला उच्च न्यायालयात जामीन मंजूर

0
गाजलेल्या बलात्कार प्रकरणातील सहआरोपी विकास राठोड याला उच्च न्यायालयात जामीन मंजूर

उदगीर (एल पी उगिले): शहरातील गाजलेल्या बलात्कार प्रकरणातील सहआरोपी विकास राठोड याला उच्च न्यायालयाचे न्या.अरुण एस. पेडणेकर यांनी जामीन मंजूर केला आहे.
फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, नोकरीचे आमिष दाखवत आरोपी सुनील जाधवने तिला व तिच्या पतीसह उदगीर येथे बोलावून घेतले. त्यानंतर काम मिळवून देतो, असा बहाणा करून शेठ ला भेटण्याच्या बहाण्याने आरोपी सुनिल जाधव याने तिला दुचाकीवरून नेले, व रस्त्या लगतच्या झुडपात घेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.या दरम्यान सुनील जाधवचे दोन मित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीहि फिर्यादीला मारहाण करून जीवाने मारण्याच्या धमक्या दिल्याचे आणि शारीरिक संबंध ठेवण्यास पीडित महिलेला भाग पाडले, असे पुरवणी जबाबात नमूद आहे.
सदर प्रकरणी आरोपी विकास राठोड यांनी सत्र न्यायालय उदगीर येथे नियमित जामीन अर्ज दाखल केला असता सदर अर्ज फेटाळला गेला. सदर नराजीने आरोपी ने उच्च न्यायालयात अ‍ॅड. अजिंक्य रेड्डी
यांच्या मार्फत जामीन अर्ज सादर केला. सदर प्रकरणी फिर्यादी महिलेलने मूळ फिर्यादी मध्ये आरोपी विकास याने जबरी शारीरिक संबंध केल्याचे आरोप केले नाहीत. तसेच फिर्यादी च्या कलमी १८३ भारतीय न्याय सुरक्षा संहिता, २०२३ अन्वये नोंदवलेल्या जबाबात आरोपी विकास याने शारीरिक संबंध केल्याचा आरोप नाही. या आशयाचा युक्तिवाद केला. सदर प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्या. अरुण एस. पेडणेकर यांनी जामीन मंजूर केला. सदर प्रकरणी अ‍ॅड. अजिंक्य रेड्डी यांनी युक्तिवाद सादर केला, तर अ‍ॅड. विष्णु कंदे यांनी त्यांना सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!