ग्राहकातील विश्‍वासावर एमएनएस बँकेचा ब्रँड राज्यामध्ये निर्माण करू- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

0
ग्राहकातील विश्‍वासावर एमएनएस बँकेचा ब्रँड राज्यामध्ये निर्माण करू- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधि)

ग्राहक व कर्मचार्‍यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. महाराष्ट्र नागरी बँकेच्या माध्यमातून घरबसल्या ग्राहक व सभासदांना ऑनलाईन सेवा मिळत आहे. ए.आय. सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फोन-पे, गुगल-पे, एनएफटी, आरटीजीएस, एटीएम, मोबाईल बँकींग या सुविधा ग्राहक व सभासदांना मिळत असून या सर्व ऑनलाईन सेवांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अधिकारी, कर्मचारी यांनी समर्पित व सेवाभावी वृत्तीने दिलेल्या सुविधांमुळे ग्राहकांमध्ये विश्‍वासार्हता निर्माण झालेली आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही अधिकारी कर्मचार्‍यांच्या सहकार्याने चांगली सेवा देऊन निर्माण झालेल्या विश्‍वासावर महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचा ब्रँड राज्यामध्ये निर्माण करण्याचे काम आपण करू असे प्रतिपादन महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

यावेळी ते महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी या सर्वसाधारण सभेला एमएनएस बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, बँकेच्या संचालिका तथा लातूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर, संचालक सूर्यकांतराव शेळके, रावसाहेब पाटील, सुभाषअप्पा सुलगुडले, शिवाजीराव देशमुख, रविंद्र कांबळे, विष्णूदास भूतडा, गोर्धनदास भंडारी, अ‍ॅड.गंगाधर हामणे, अ‍ॅड.चंद्रकांत आगरकर, नितीन कोरे, कौशल्याताई खोसे, अरूणाताई कांदे, एनएनएस बँकेचे प्र.कार्यकारी संचालक नितीन सराफ, जनरल मॅनेजर किशनसिंह गहेरवार,गणेश पवार, शाखा व्यवस्थापक संतोष कदम, शाखा व्यवस्थापक रोहन कदम, शाखा व्यवस्थापक दत्ता पाटील, आशितोष पाटील, वसुली अधिकारी विश्‍वनाथ सुरवसे, सुशिल रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, भारत देश हा जगामध्ये गतीने प्रगती करणारा देश आहे. मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली भारताची प्रगती चांगल्या पध्दतीने सुरू आहे. देशाच्या चौफेर विकासासाठी ना.मोदीजींनी चीन, रशिया या देशांना जवळ करण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे जग हे एका खेड्यासारखे लहान झालेले आहे. जगात कुठेही घटना घडली की, ती क्षणात आपल्यापर्यंत येते आणि त्याचा परिणाम येथील व्यवस्थेवर होतो. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारताची प्रगती साधण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली झालेले आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी अठराव्या शतकात केलेली भविष्यवाणी खरी ठरून एकविसाव्या शतकामध्ये भारत महासत्ता बनून जगाचे नेतृत्त्व करेल, असा विश्‍वासही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संयोजन समितीच्यावतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध विभागातून उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी, उत्कृष्ठ ठेवीदार, कर्जाची वेळेत परतफेड करणारे कर्जदार, बँकेचे सल्‍लागार यांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे प्र.कार्यकारी संचालक नितीन सराफ यांनी केले. त्यानंतर बँकेचे उपाध्यक्ष एस.आरे मोरे यांनीही मनोगत व्यक्‍त करून बँकेच्या प्रगतीचा आलेख मांडण्याचे काम केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अब्दुल गालिब शेख यांनी केले तर आभार पतंजलि योग पिठाचे महाराष्ट्र प्रभारी विष्णूजी भूतडा यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला बँकेचे ग्राहक, सभासद, अधिकारी, कर्मचार्‍यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अधिकारी, कर्मचार्‍यांच्या समन्वयातून बँकेची प्रगती साधण्याचे काम करू- प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर

महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून व अधिकारी, कर्मचार्‍यांच्या समन्वयातून ग्राहकांचे हित साधण्याचे काम गेल्या 29 वर्षापासून केले जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना सर्व सुविधा पुरविण्याचे काम केले जात आहे. सचोटी, सौजन्य व स्वाभीमान याचा अंगिकार करून बँकेला प्रगतीपथावर पोहचविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे बँकेच्या प्रगतीमध्ये आपले हीत आहे. हे लक्षात घेऊन अधिकारी, कर्मचार्‍यांच्या समन्वयातून महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची प्रगती साधण्याचे काम आपण सर्वांना सोबत घेऊन करू असे आवाहन एमएनएस बँकेच्या संचालिका प्रतिभताई शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

बँकेच्या प्रगतीबद्दल मुख्यमंत्री महोदयांकडून कौतुक -अ‍ॅड.चंद्रकांत आगरकर

महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेेने 29 वर्षामध्ये ग्राहक, सभासदांना विश्‍वासात घेऊन बँकेची चौफेर प्रगती साधण्याचे काम केलेले आहे. बँकेच्या देदिप्यमान कार्याबद्दल बँकेला पद्मश्री वसंतदादा पाटील पुरस्कार मिळालेला आहे. यासह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. या बँकेच्या प्रगतीचा आलेख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहचला असून त्यांनी महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचा राज्यस्तरीय कार्यशाळेत उल्‍लेख होताच महाराष्ट्र नागरी बँक ही उत्कृष्ठ बँक असून या बँकेची प्रगती चांगली आहे. अशी पुष्टी त्यांनी त्यावेळी बोलताना केली होती. त्यामुळे बँकेच्या प्रगतीबद्दल मुख्यमंत्री महोदयांकडून कौतुक होते, ही आपल्या सर्वांची दृष्टिने आनंदाची बाब आहे. असे प्रतिपादन अ‍ॅड.चंद्रकांत आगरकर यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!